Menu

श्रीगणेशाविषयी माहिती..#गणपती

0 Comments


श्रीगणेशा विषयी अध्यात्मिक माहिती

‘गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !’ असे म्हणण्याचा भावार्थ

‘प्रश्न : प्रत्येक वर्षी श्री गणेश चतुर्थीला, म्हणजे एक वर्षानेच गणपति येत असतो, तर तो पुढच्या वर्षी लवकर कसा
येईल ?

उत्तर : आरंभी आपले दिवस भराभर कालक्रमण करत असतात, त्यामुळे सुखाचा एक मास कसा गेला, हे कळतही नाही. या उलट जेव्हा आपण दुःखात असतो, तेव्हा दिवस संपता संपत नाहीत; म्हणून ‘पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हणतो. याचा भावार्थ किंवा गर्भितार्थ, म्हणजे ‘वर्षभर आम्हाला सुखात ठेव !’ असा आहे.’

– डॉ. वसंत बाळाजी आठवले, मुंबई. (जून २०११)

गणपतीला कोणत्या गोष्टी प्रिय आहेत ?

गणपतीला गणेश चतुर्थी व्यतिरिक्त अन्य दिवशी तुळस निषिद्ध आहे. तांबडी फुले, मंदार, जास्वंद, तांबडी कमळे, दूर्वा आणि शमी ही गणपतीला प्रिय आहेत.

उंदीर हा काळाचे प्रतीक !

उंदीर : हा ज्याप्रमाणे पदार्थ कुरतडत असतो, त्याप्रमाणे कालही सृष्ट पदार्थ नाश करत असतो; म्हणून उंदीर हा काळाचे प्रतीक आहे.

गणपति : काळाला जिंकून त्यावर वाहन म्हणून जो स्वार झाला, तो खरा गणपति होय.

श्री गणेशाच्या ऋद्धी-सिद्धी !

शक्तीचा प्रसव, प्रतीप्रसव क्रम आणि श्री गणेशाच्या ऋद्धी-सिद्धी

‘जगताकडे प्रवाहित होणार्‍या शक्तीला ‘प्रसव क्रम’ आणि आत्म्याकडे प्रवाहित जागृत शक्तीला ‘प्रतीप्रसव क्रम’ म्हणतात. याच आधारावर ‘श्री गणेश ऋद्धी-सिद्धी यांचा दाता आहे’, या विधानाचे स्पष्टीकरण करता येईल.

१. ऋद्धी

शक्ती किंवा श्री गणेश बहिर्जगताभिमुख जागृत होतात, तेव्हा जीव जगताभिमुख कार्य करतो आणि ऋद्धी प्राप्त करतो.

२. सिद्धी

जेव्हा शक्ती किंवा श्री गणेश अंतर्मुख, जागृत आणि प्रवाहित होतात, तेव्हा जिवाचा मार्ग परमसिद्धीरूपी आत्मस्थितीला प्राप्त करण्याच्या हेतूने प्रशस्त होतो.’

प्रथम प्रदक्षिणा कोणी घातली ?

पुराणात पहिली प्रदक्षिणा बुद्धीदात्या श्री गणेशाने शिव-पार्वती यांना घातली आहे.

कलियुगात लवकर प्राप्त होणार्‍या
आणि फलदायी असणार्‍या देवता कोणत्या ?

कलियुगात लवकर प्राप्त होणार्‍या आणि फलदायी असणार्‍या देवता दोनच आहेत – ‘कलौ चंडिविनायकौ’, म्हणजे ‘कलियुगात चंडी म्हणजे देवी आणि विनायक म्हणजे गणपति, ही दोन दैवते लवकर फलदायी होतात.

गणेश देवतेविषयी माहिती गणेशपुराण, मुद्गलपुराण, गणेश महात्म्य यांमध्ये आहे. तसेच पद्मपुराण, भविष्योत्तरपुराण, लिंगपुराण, ब्रह्मवैवर्तपुराण, शिवपुराण या पुराणांमध्येही आहे. तसेच काही उल्लेख महाभारतातही आहेत; पण ही वैदिक देवता आहे. वेदांत तिचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.

१. ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे ।
कविं कवीनामुपश्रवस्तमम… ।’ – ऋग्वेद

२. ‘गणानां त्वा गणपतिं हवामहे’
प्रियाणां त्वा प्रियपतिं हवामहे… ।’ – अथर्ववेदातील अथर्वशीर्ष

Source – sanatan sanstha website..

Please follow and like us:
Tags: , , , ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *