अंगणगाव एमआयडीसीत परप्रांतीय मजुराची हत्या; अवघ्या पाच तासांत लागला छडा 

येवला (जि.नाशिक) : अंगणगाव येथील औद्योगिक वसाहतीत परप्रांतीय मजुराचा खून झाल्याची घटना घडली. या खुनाचा अवघ्या पाच तासांत येवला शहर पोलिसांनी छडा लावला. शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. काय घडले नेमके?

सहकारी करायचा छळ
सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खडांगळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सोमवारी (ता. २१) रात्री दहाच्या सुमारास अंगणगाव औद्योगिक वसाहतीत प्लॉट क्रमांक आठमधील एका सिमेंट टाइल्स बनविणाऱ्या कारखान्यात मजूर म्हणून काम करणाऱ्या दोन सहकाऱ्यांमधील एकजण दारू पिऊन दुसऱ्यास खोली साफ करायला लावणे, दारूच्या नशेत विष्ठेने भरलेली पॅन्ट धुवायला लावणे या कारणावरून ही घटना घडली. 

 हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

डोके भिंतीवर आपटून दाबला गळा
मुख्य संशयित आरोपी राहुलकुमार रावल (वय २२, रा. फिरोदपूर, उन्नाव, उत्तर प्रदेश) याने त्रास देणाऱ्या बाबूलाल रावत (४०, रा. फिरोदपूर) याचे डोके भिंतीवर आपटून गळा दाबल्याने बाबूलाल कासी ठार झाला. यानंतर संशयित आरोपी राहुलकुमार रावल याने पोलिसांना झोपेतच त्याचा मृत्यू झाला आहे, अशी खोटी माहिती दिली. येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करताना कसून तपास करत अवघ्या पाच तासांतच बाबूलाल रावत याच्या मृत्यूचा छडा लावत संशयित आरोपी राहुलकुमार रावल यासला अटक केली.  

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ