अंजनेरी गडासाठी पेगलवाडीचा पर्यायी रस्ता; गड विकासासाठी ग्रामस्थांकडून सूचना 

अंजनेरी (नाशिक) : अंजनेरी गडावर जाण्यासाठी मुळेगावमार्गे डांबरी रस्त्याला पर्यावरणप्रेमी व अंजनेरी ग्रामस्थांनी विरोध केल्याने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी रस्ता उभारणी थांबविली. मात्र गडाचा विकास आणि पर्यटन विकासाला खीळ बसू नये म्हणून ग्रामस्थांनी पेगलवाडी घळीतून पर्यायी रस्ता सुचविला आहे. 

पिनाकेश्‍वर महाराज, पेगलवाडीचे सरपंच पांडुरंग आचारी व भाऊसाहेब कोठे यांच्या पुढाकारातून इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर आणि नाशिक अशा तिन्ही तालुक्यांतील ग्रामस्थांनी अंजनेरी गडावरील रस्ताप्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्यावर बैठकीत चर्चा झाली. शिवसेना तालुका समन्वयक समाधान बोडके अध्यक्षस्थानी होते. तिन्ही तालुक्यांतील सरपंच, पोलिसपाटील व राजकीय पदाधिकारी यांनी एकत्र येऊन मुळेगावमार्गे अंजनेरी गडावर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ठरले. 
बैठकीत, मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे एकच बाजू मांडली गेली, अशा तक्रारीचा सूर मांडला गेला. तसेच तिन्ही तालुक्यांतील छोट्या गावातील रहिवाशांना रोजगार उपलब्ध व्हावा, रस्त्यासाठी तोडण्यात येणाऱ्या वृक्षांच्या दहापट लागवड करू, असेही दावे केले गेले. रत्नाकर चुंभळे, त्र्यंबक नामदेव पगार, काशीनाथ लचके, पांडुरंग लचके, अशोक नेटावर, सोमनाथ धोंगडे, सदाशिव मोरे, बच्चन मेंगाळ, शंकर गोवर्धन, मच्छिंद्र गोवर्धने, भाऊसाहेब झोंबी, काशीनाथ वारघडे, सोमनाथ बेझेकर, पांडुरंग आचारी, भाऊसाहेब कोठे, रामनाथ गोहिरे, तानाजी दिवे, बाजीराव कसबे, रंगनाथ मिंदे, शिवाजी कसबे, बाजीराव गायकवाड आदींसह तिन्ही तालुक्यांतील ग्रामस्थ उपस्थित होते. 

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय

काय आहे पर्याय 

अंजनेरी गडाचे पर्यावरण व वन्यजीवांचे संवर्धनासाठी हा भाग राखीव असल्याने येथे पक्के रस्ते अथवा बांधकाम होणार नसल्याने मुळेगाव रस्त्याला स्थगिती मिळाली आहे. मुळेगावऐवजी पेगलवाडीलगतच्या घळीतून कमी पैशांत व सुरक्षित त्र्यंबकेश्वरलगत असा रस्ता होऊ शकतो व वादावर पडदा पडू शकतो, असा पर्याय पुढे आला आहे. 

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

अंजनेरी गडावरील हनुमान जन्मस्थान उपेक्षित आहे. गडावर कोणत्याही भागातून रस्ता होऊ द्या; पण हनुमान जन्मस्थानाचा विकास व्हावा, असाच सर्वांचा संकल्प असायला हवा. 
-पिनाकेश्‍वर महाराज