‘अंनिस’ अन्‌ पोलिसांमुळे पंचायतीची ‘पंचाईत’; जिल्हाधिकाऱ्यांनी हलविली पोलिस यंत्रणा 

नाशिक  : शासनाच्या बंदीनंतरही जातपंचायत होत असल्याचे प्रकार समोर येत असून, असाच एक प्रकार पंचवटीत उघडकीस आला आहे. ‘अंनिस’ आणि पोलिसांच्या पथकामुळे नियोजित जातपंचायतीची चांगलीच ‘पंचाईत’ झाल्याचे समोर आले. थेट जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे पोलिस यंत्रणाही खडबडून जागी झाली आणि नियोजित ठिकाणी जाऊन धडकली. मात्र, मुलगा आणि मुलीने ऐनवेळी माघार घेतल्याने पोलिसांनाही गुन्हा दाखल करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. 

सुरगाणा येथील वैदू समाजाच्या एका मुलीने तिच्याच जातीतील मुलाशी प्रेमविवाह केला. या प्रकरणी म्हसरूळ भागातील वैदूवाडी येथे जात पंचायत भरणार होती. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे निवेदन देऊन तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षकांना आदेश दिले. कार्यकर्त्यांनी म्हसरूळ पोलिस ठाणे गाठले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक पी. आर. ढोकणे यांची भेट घेतली.

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

पोलिसांनी वैदूवाडी येथील म्हसोबा मंदिर परिसरात धाड टाकली. कोरोनाचे नियम डावलून लोकांची गर्दी जमल्याचे दिसून आले. जातपंचायत होत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी मुख्य पंच व इतर लोकांना पोलिस ठाण्यात आणले. उशिरापर्यंत जबाब घेण्याचे काम सुरू होते. मोहिमेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, महेंद्र दातरंगे, ॲड. समीर शिंदे, कोमल वर्दे, नितीन बागूल यांनी भाग घेतला. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा