अंबादास दानवे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर

अंबादास दानवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सोमवारी (दि.२०) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी तीन वाजता इगतपुरीतील जिंदाल पॉलिमर कंपनीला ते भेट देणार आहेत. या भेटीत कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यानंतर आवळी (ता. इगतपुरी) येथे वैतरणा-मुकणे वळण योजनेची ते पाहणी करतील.

तर सायंकाळी साडेपाचला दानवे हे त्र्यंबकेश्वर येथे श्री भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणार आहेत. ठाकरे गटाने ना. दानवे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे.

हेही वाचा : 

The post अंबादास दानवे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर appeared first on पुढारी.