अंबासनला बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार; पिंजरा लावूनही सापडेना बिबट्या

अंबासन (नाशिक) : येथील गावाजवळील खळवाडीत शेतकरी खंडू सुकदेव आहिरे यांच्या गाईच्या दोन वर्षीय वासरावर बिबट्याने हल्ला चढवत ठार केल्याची घटना घडली. ताहाराबाद वनपरिक्षेत्रातील वनकर्मचा-यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पिंजरा लावला पण..

परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून तळ ठोकून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अनेक मुक्या जनावरांवर बिबट्याने हल्ला चढवत फस्त केल्याची घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे नागरिकांना आता दिवसाही बिबट्याचे दर्शन होऊ लागले असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून बोलले जात आहे. वनविभागाने दखल घेऊन काही दिवसांपूर्वी गावाजवळील ढेक-या डोंगराच्या पायथ्याशी पिंजरा लावला आहे. मात्र बिबट्या हुलकावणी देत असून जनावरांवर हल्ले सुरूच असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

गावातील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलाच्या बाजूला शेतक-यांची खळवाडी आहे. या खळवाडीत शेतक-यांची दुभती जनावरे दावणीला बांधलेले असतात. येथील शेतकरी खंडू सुकदेव आहिरे यांच्या खळ्यातील दोन वर्षीय गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवत ठार केल्याची घटना घडली घडली आहे. तंटामुक्त अध्यक्ष शैलेंद्र कोर यांनी वनविभागाने माहिती दिली. यावेळी वनकर्मचारी रेणूका आहिरे, राजेंद्र साळुंखे व मेजर के. एम. आहिरे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच