अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्तायादी जाहीर; यादीत ६ हजार ७६९ विद्यार्थ्यांचा समावेश 

नाशिक : इयत्ता अकरावीची दुसरी गुणवत्तायादी शनिवारी (ता. ५) प्रसिद्ध करण्यात आली असून, पहिल्‍या यादीच्‍या तुलनेत विज्ञान शाखेचा कट ऑफ अर्ध्या टक्‍याने कमी झाला आहे. आरवायके महाविद्यालयात खुल्‍या प्रवर्गाचा कट ऑफ ९५ टक्‍के राहिला, तर वाणिज्य शाखेतून बीवायके महाविद्यालयाचा कट ऑफ ९४ टक्‍के इतका आहे. दुसऱ्या यादीत सहा हजार ७६९ विद्यार्थ्यांचा समावेश असून, यापैकी दोन हजार ८८४ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. प्रवेश निश्‍चितीसाठी बुधवार (ता. ९)पर्यंत मुदत असेल. 

दहावीचा निकाल उंचावल्‍यामुळे यंदा अकरावीचा कट ऑफदेखील वाढला आहे. यापूर्वी पहिल्‍या गुणवत्ता यादीत विज्ञान शाखेतील खुल्‍या गटाचा कट ऑफ ९५.५० टक्‍के होता. यात केवळ अर्धा टक्‍का घट होऊन दुसऱ्या यादीतील कट ऑफ ९५ टक्‍के राहिला. दुसऱ्या यादीत निवड झालेल्‍या विद्यार्थ्यांमध्ये एक हजार २६४ विद्यार्थी कला शाखेसाठी, दोन हजार ३३४ विद्यार्थी वाणिज्‍य, तर तीन हजार ४८ विद्यार्थी विज्ञान शाखेसाठी पात्र ठरले आहेत. यापूर्वी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांना खुल्‍या किंवा ईडब्‍ल्‍यूएस प्रवर्गातून अर्ज सादर करायचे होते. यातूनही गुणवत्तायादीतील टक्‍केवारी उंचावली गेल्‍याची शक्‍यता आहे. दरम्‍यान, दुसऱ्या यादीत प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असेल. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

२३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित 

गुणवत्तायादी जाहीर होताच विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीची संधी उपलब्‍ध करून दिली होती. त्‍यानुसार शनिवारी (ता. ५) सायंकाळी पाचपर्यंत कोटा प्रवेशातून ४५ विद्यार्थ्यांनी, तर कॅप राउंडच्‍या माध्यमातून १९३ अशा एकूण २३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. 

कला शाखेच्‍या प्रवेशासाठीही चुरस 

कला शाखेतून एचपीटी महाविद्यालयाचा खुल्‍या प्रवर्गाचा कट ऑफ ८९ टक्‍के राहिला. तर केटीएचएम महाविद्यालयात आणि भोसला महाविद्यालयात ८० टक्क्यांचा कट ऑफ आहे. त्‍यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये कला शाखेत प्रवेशासाठीदेखील चुरस बघायला मिळते आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

 
शहरातील प्रमुख महाविद्यालयांतील स्थिती 

विज्ञान (अनुदानित) वाणिज्‍य (अनुदानित) 
खुला एससी एसटी ओबीसी ईडब्‍ल्‍यूएस खुला एससी एसटी ओबीसी ईडब्‍ल्‍यूएस 
आरवायके आणि बीवायके महाविद्यालय 
९५ ८५ ८५ ९२ ६५ ९४ ७५ ४९ ८७ ४८ 
केटीएचएम महाविद्यालय (इंग्रजी माध्यम) 
९४ ८२ ८५ ९० ७० ९१ ७१ ६६ ८५ ५१ 
बिटको महाविद्यालय, नाशिक रोड 
९३ ८३ ८० ८७ ६२ ९० ७४ ४६ ८० ८४ 
लोकनेते व्‍यंकराव हिरे महाविद्यालय 
९१ ७८ ८३ ८६ -- ७६ ६२ ७१ ६० -- 
व्‍ही. एन. नाईक महाविद्यालय 
९३ ७५ ८१ ८८ ७८ ७७ ६४ ७१ ६५ -- 
भोसला सैनिकी महाविद्यालय 
९२ ८० ८३ ८९ ६५ ९० ७७ ७३ ८३ ६५ 
वाय. डी. बिटको (मुलींचे) महाविद्यालय 
९१ ८० ८६ ८७ -- ८२ ७० ७६ ७१ -- 
के. एस. के. डब्‍ल्‍यू. महाविद्यालय, सिडको 
९३ ७८ ८२ ८९ -- ७९ ५९ ६२ ५९ -- 
जी. डी. सावंत महाविद्यालय 
८८ ३८ ५७ ८२ -- ७३ ५८ ५३ ४० --