अखेरच्या क्षणीही साथ! पत्नीच्या निधनानंतर काही तासांत पतीने संपविली जीवनयात्रा; मुलं झाली पोरकी

नाशिक : संसाराच्या गाड्याचे दोन चाक असतात ते म्हणजे पती-पत्नी.. लग्न करताना एकसाथ जगण्या-मरण्याची वचने घेतली तीच अखेरच्या क्षणीही पतीने निभावली. पण अशातच संसाररुपी वेलीवर फुल उमलले ती म्हणजे त्यांची दोन मुलं आता कायमची पोरकी झाली आहेत. एकाच वेळी आई-वडिलांच्या एकत्रच अंत्ययात्रा निघाल्याने मुलांना धक्का बसला आहे. तर परिसरात या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काय घडले नेमके?

पत्नीच्या निधनानंतर काही तासांत पतीने संपविली जीवनयात्रा
सातपूरच्या श्रमिकनगर येथील माळी कॉलनी येथे राहणारे संगीता रवींद्र पवार (वय ४४) यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यावेळी त्यांना तातडीने सोमवारी (ता.२९) रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी पहाटे मुलाने वडिलांना फोनवरून कळविली. मुलाने पुन्हा फोन केला असता रवींद्र यांनी फोन उचलला नाही. मुलाने याची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यांनी माहिती घेतली असता रवींद्र पवार यांनी फॅनला साडीने गळफास लावून घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ते सातपूर औद्योगिक वसाहतीमधील खासगी कंपनीत कामाला होते. नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या पत्नीच्या निधनाची माहिती मिळताच पतीने आत्महत्या केल्याची घटना श्रमिकनगर परिसरात आज (ता.३०) पहाटे घडली.

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

मुलं झाली पोरकी
रवींद्र तुळशीराम पवार (वय ५२),संगीता रवींद्र पवार (वय ४४) अशी मृत पती-पत्नीचे नावे आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर काही तासांत पतीने जीवनयात्रा संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड