अखेर जन्मठेपेसारख्या नरकयातनेतून लेकीची सुटका; वडिलांच्या हत्येचा होता आरोप 

सातपूर (नाशिक) : सातपूर पोलिस ठाण्यात २८ डिसेंबर २००६ ला दिलीप देवरे यांच्या खूनप्रकरणी पत्नी कमलाबाई देवरे व मुलगी मंगला शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून मृताची पत्नी कमलाबाई देवरे आणि मुलगी मंगला शिंदे यांच्याविरुद्ध नाशिक सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

जन्मठेपेसारख्या नरकयातनेतून लेकीची सुटका
 दिलीप देवरे यांच्या खूनप्रकरणी कमलाबाई देवरे व मुलगी मंगला शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून मृताची पत्नी कमलाबाई देवरे आणि मुलगी मंगला शिंदे यांच्याविरुद्ध नाशिक सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. नाशिक सत्र न्यायालयाने कमलाबाई आणि मंगला शिंदे यांना ९ डिसेंबर २०१३ ला जन्मठेप ठोठावली. त्यावरून त्या दोघांची मध्यवर्ती कारागृहात रवानगीही झाली होती. मात्र, या शिक्षेविरोधात औरंगाबाद खंडपीठात सबळ पुराव्याअभावी मुलगी मंगला शिंदे यांची निर्दोष मुक्तता झाली, अशी माहिती ॲड. अनिकेत निकम यांनी दिली.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

पुरावा नसताना मुलीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावणे बेकायदेशीर
या शिक्षेविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले. तेथे ॲड. अनिकेत निकम यांनी आरोपींची बाजू मांडली. हा पूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे. पुराव्यांची साखळी सकृत्दर्शनी आरोपींचा गुन्हा सिद्ध करत नाही. ज्या दिवशी घटना घडली, त्या रात्री मुलगी मंगला शिंदे घरात होती, अशा स्वरूपाचा सबळ पुरावा न्यायालयापुढे आला नाही. पुरावा नसताना मुलीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे तिची निर्दोष मुक्तता करावी, असा युक्तिवाद ॲड. निकम यांनी मांडला. 
सरकारी पक्षातर्फे सौ. शिंदे यांना शिक्षा योग्य रीतीने ठोठावली आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

सबळ पुरावा कोर्टापुढे आलेला नाही,

आरोपींना निर्दोष मुक्त करू नये किंवा शिक्षाही कमी करू नये, अशी बाजू मांडली. द्विसदस्यीय खंडपीठाच्या न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायामूर्ती नितीन बोरकर यांनी दोघी पक्षांची बाजू ऐकल्यानंतर मुलगी मंगला शिंदेविरुद्ध सकृतदर्शनी तिने आपल्या वडिलांचा खून केला आहे, असा सबळ पुरावा कोर्टापुढे आलेला नाही, अशा निकाल देत मुलीला सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. यामुळे मंगला शिंदे हिची नाशिक कारागृहात लवकरच सुटका होईल, अशी अपेक्षा नातेवाईक व्यक्त करीत आहेत.