अखेर देवळालीकरांची प्रतिक्षा संपली! कोरोना लसीकरणाचा होणार श्रीगणेशा

नाशिक : देवळाली कॅम्पला कोरोना लस कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, ही प्रतीक्षा अखेर संपली असून पासून लसीकरणाला सुरवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्धे अर्थात, पंचक्रोशीतील १०० लाभार्थी डॉक्टर-नर्स-आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यातील लसीकरण

कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे, पंचायत समिती सभापती विजया कांडेकर, रत्नाकर चुंभळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे, नगरसेवक बाबूराव मोजाड, भगवान कटारिया, नगरसेविका कावेरी कासार, मीना करंजकर, आशा गोडसे, तानाजी करंजकर, भाऊसाहेब धिवरे, रतन कासार, चंद्रकांत गोडसे, गटविकास अधिकारी सारिका बारी, सहाय्यक गटविकास अधिकारी विनोद मेढे, डॉ. कैलास भोये, सीईओ अजय कुमार वैद्यकीय अधिकारी जयश्री नटेश, डॉ. शाहू पाटील, डॉ. नरेश दौलतानी आदींच्या उपस्थितीत लस देण्यात आली.

एक हजार डोस उपलब्ध

दुसऱ्या टप्प्यात पोलिस, पालिका कर्मचारी, सफाई कामगार आदींना लस दिली जाणार असल्याची माहिती डॉ. जयश्री नटेश यांनी दिली. येथील डेडिकेटेड कोविड केअर सेंटर असलेल्या देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलसाठी एक हजार डोस उपलब्ध झाले आहेत.