अखेर बिहारमधील दोघांच्या मुसक्या आवळल्या! बँकेची आणि स्टर्लिंग मोटार्स आस्थापनाची मोठी फसवणूक

नाशिक : स्टर्लिंग मोटार्सचे युनियन बँकेत खाते असून, नेहमीच मोठे आर्थिक व्यवहार होत असतात. बँकेच्या प्राधन्य ग्राहकांत स्टर्लिंग मोटार्स आणि त्याचे मालक फोन अथवा ई-मेलच्या माध्यमातून बँक आर्थिक व्यवहार पूर्ण करते. अशातच मोठी ऑनलाइन फसवणुक झाल्याने सर्वांचेच धाबे दणाणले. 

भामट्यांनी घेतला फायदा; बनावट प्रकार समोर

स्टर्लिंग मोटार्सचे युनियन बँकेत खाते असून, नेहमीच मोठे आर्थिक व्यवहार होत असतात. बँकेच्या प्राधन्य ग्राहकांत स्टर्लिंग मोटार्स आणि त्याचे मालक फिरोज मिस्त्री येत असल्याने फोन अथवा ई-मेलच्या माध्यमातून बँक आर्थिक व्यवहार पूर्ण करते. याचाच फायदा भामट्यांनी घेतला. ४ फेब्रुवारीला मिस्त्री यांच्या नावे बँकेत फोन करण्यात आला. तत्काळ पेमेंट करायचे असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर स्टर्लिंग मोटार्स कंपनीच्या अधिकृत ई-मेलप्रमाणेच बनावट ई-मेल तयार करून त्यावर अधिकृत दिसणाऱ्या लेटरहेडचा वापर करीत मिस्त्री यांच्या बँक खात्यातून रक्कम काढून घेतली. या व्यवहाराची माहिती मिस्त्री यांना मिळताच त्यांनी बँकेशी संपर्क साधला. बँकेने फोन आणि ई-मेलची माहिती घेतली असता हा बनावट प्रकार समोर आला.

हेही वाचा -  नाशिकमध्ये आता कोरोनाचा युरोपियन स्ट्रेनचे संकट; काय आहे हा बी.१.१.७ स्ट्रेन? डॉक्टरांची माहिती

ऑनलाइन फसवणुकीत युपीच्या दोघांच्या मुसक्या आवळल्या 

बनावट आणि कंपनीच्या खऱ्या ई-मेल आयडीशी साधर्म्य असल्याचा फायदा घेत शहरातील स्टर्लिंग मोटार्स आस्थापनाच्या १८ लाख ७९ हजार ७०० रुपयांवर डल्ला मारणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बिहार राज्यात ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणी गेल्या महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फैयाज मन्सुरी (वय २४, रा. हफुवा बलराम, उत्तर प्रदेश) आणि प्रेमसागर महेश राम (वय २१, रा. बाथना कुटी, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवराज बोरसे आणि त्यांचे पथक ९ मार्चपासून बिहार राज्यातील गोपाळगंज येथे तळ ठोकून होते. या पथकाने सखोल तपास करून दोघांच्या मुसक्या आवळल्या. 

हेही वाचा - सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

फोन आणि ई-मेल आयडीच्या मदतीने फसवणूक
दोन्ही संशयित पोलिस कोठडीत असून, २२ तारखेला कोठडीची मुदत संपणार आहे. ४ ते ५ फेब्रुवारीदरम्यान फोन आणि ई-मेल आयडीच्या मदतीने भामट्यांनी बँकेची आणि स्टर्लिंग मोटार्स या अस्थापनाची फसवणूक केली.