अखेर भरकटलेल्या बछड्याची अन् आईची भेट झालीच…पाहा VIDEO

नाशिक : (निफाड) सकाळी नेहमीप्रमाणे ते शेतात गेले. काही वेळात त्यांना दिसले भरकटलेले बिबट्याचे बछडे. आधी के जरा घाबरलेच. नंतर केले धाडस अन् त्यातून घडली आईची अन् बछड्याची भेट...वाचा सविस्तर प्रकार

अशी आहे घटना

मंगळवार (ता. 1) सकाळी 6.30 वाजता बाळासाहेब झाल्टे (रा. वडाळी नजिक, ता. निफाड) हे शेतामध्ये गेले. काही वेळातच त्यांना तेथे एक बछडे दिसले. हे बछडे तीन के चार महिन्याचे असल्याचे त्यांचा लक्षात आले. त्यांनी त्याला सुरक्षितरित्या निफाड रोपवाटिका येथे आणले. चांदोरे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. बछड्याची तब्येत व्यवस्थित असल्याचे समजताच त्या पुन्हा त्याच्या आईच्या म्हणजेच बिबट्या मादीच्या ताब्यात देण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. सायंकाळी पाचच्या सुमारास डॉक्टर सुजित नेवसे, सहाय्यक वनसंरक्षक, संजय भंडारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला, जाधव वनपाल मनमाड, महाले वनरक्षक विंचुर, विलास देशमुख वनसेवक व इतर स्टाफ घेऊन वडाळी येथे नेले. बछडे भरकटू नये यासाठी त्यास लोखंडी जाळी खाली झाकून ठेवण्यात आले होते. सदर जाळी एक दोरी बांधण्यात आली होती. त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मादी बछड्याच्या जवळ गेल्यानंतर जाळीची दोरी खेचून पिल्लास मोकळे करण्यात आले. पिल्लू धावतच मादी बिबट्याजवळ गेले.

मादी व बछड्याला भेटवण्यासाठी केलेले कार्यात नितीन  गुदगे मुख्य वनसंरक्षक, नाशिक वनवृत्त, तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक पूर्वभाग नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इको एको संस्था नाशिक राहूल कुशारे व वडाळी नजिक येथील ग्रामस्थ यांचे सहकार्य मोलाचेच.