अजबच! चक्क महादेवाच्या पिंडीवर नागिणीने दिले अंडे; ग्रामस्थांनी पाहण्यासाठी एकच गर्दी

पेठ (जि.नाशिक) : भगवान शंकराची आपण जेव्हा मूर्ती पाहतो. तेव्हा आपल्याला त्यांच्या गळ्यात नाग अवश्य दिसतो. पौराणिक ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार या नागाचे नाव वासुकी असे आहे. पण जेव्हा चक्क शंकराच्या पिंडीवर नागिणीने अंडे दिले असल्याची बातमी लोकांपर्यत वाऱ्यासारखी पोहचली आणि परिसरात हाच सध्या चर्चेचा विषय झाला आहे. बरेच लोकं हे पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

चक्क महादेवाच्या पिंडीवर नागिणीने दिले अंडे 
पेठ तालुक्यातील खडकी येथील मंदिरात नागिणीने शंकराच्या पिंडीवर अंडे दिले असून, वेढा घालून बैठक मारल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. पेठपासून भुवनमार्गे खडकी गावाजवळ दमणगंगा नदीकिनारी निर्जनस्थळी महादेव मंदिर आहे. या मंदिरात पिंडीजवळ नागिणीने अंडे देऊन तिथेच मुक्काम ठोकला. परिसरातील ग्रामस्थांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. विषारी नागीण बिळात किंवा कोशात अंडी घालते. परंतु या नागिणीने उघड्यावर अंडी टाकल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.  

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

पुराण कथांमध्ये नागाचा उल्लेख
भगवान शंकराची आपण जेव्हा मूर्ती पाहतो. तेव्हा आपल्याला त्यांच्या गळ्यात नाग अवश्य दिसतो. पौराणिक ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार या नागाचे नाव वासुकी असे आहे. हा नाग नागांचा राजा आहे. तसेच, नागलोकात याचे शासन आहे. सागर मंथनावेली या नागाने एखाद्या रश्शी प्रमाणे काम केले. ज्यामुळे सागराचे ताक घुसळल्याप्रामाणे मंथन झाले. वासुकी नाग हा भगवान शंकराचा भक्त असल्याचेही सांगितले जाते. त्याची भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला नागलोकांचा राजन बनवले. सोबतच आपल्या गळ्यातील भूषणाचा दर्जाही दिला. म्हणूनच नाग हा शंकराच्या गळ्यात वेटोळे घालून बसलेला दिसतो.

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी