Site icon

अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, नाशिकमधील भाजपच्या ‘या’ व्यक्तीने केली मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्षेप घेत अजित पवार यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार म्हणतात की, ‘छ्त्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते. अशा वक्तव्याने पवार यांनी जनतेच्या भावना दुखावल्या असून, त्यांनी तत्काळ विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत असे बोलण्याचा अधिकार पवार यांना कुणी दिला? त्यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले.

अजित पवार यांचे १४ मे २०१९ चे ट्विट भोसले यांनी दाखविले. पवार २०१९ पर्यंत संभाजी महाराज यांना धर्मवीर मानायला तयार होते. मात्र, आता २०२२ मध्ये त्यांना उपरती कशी आली?, असा सवाल भोसले यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी प्रश्न उपस्थित करत तुम्ही आपली भूमिका बदलणार का? अजित पवार यांचा निषेध करणार का? संजय राऊत यांची दातखीळ बसली आहे का, असा सवाल उपस्थित केला आहे.

हेही वाचा :

The post अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, नाशिकमधील भाजपच्या 'या' व्यक्तीने केली मागणी appeared first on पुढारी.

Exit mobile version