अजित पवार यांचे वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे : आमदार सीमा हिरे

अजित पवार यांचा निषेध,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अजित पवार यांनी विधानसभेत केलेले वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आता राष्ट्रवादी राहिली नाही तर त्यांनी मोगलशाही स्वीकारली आहे. अशी टीका आ. सीमा हिरे यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधान भवनातील वक्तव्याचा भाजपा सिडको मंडल एक व दोनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.  छत्रपती संभाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास वारंवार पुसण्याचे आणि बदलण्याचे काम होत असून आम्ही तसे करणा-यांचा निषेध नोंदवतो अशा संतप्त प्रतिक्रिया भाजप पदाधिका-यांनी यावेळी दिल्या.

याप्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सरचिटणीस जगन पाटील, प्रशांत पाटील, महेश हिरे, रामहरी संभेराव, अविनाश पाटील, शिवाजी बरके, माधुरी बोलकर, प्रतिभा पवार, अलका आहेर, राकेश ढोमसे, चारुदत्त आहेर, वैभव महाले, आदित्य दोंदे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

The post अजित पवार यांचे वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे : आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.