अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याने गमावला जीव

leopaed death www.pudhari.news

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; सिन्नर – घोटी महामार्गावर घोरवड घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्या ठार झाला.

सिन्नर तालुक्यात सद्यस्थितीत बिबट्यांचा सुळसुळाट झाला आहे. नायगाव खोऱ्यात गेल्या महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे त्रस्त नागरिकांना दिलासा देत वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. त्यात जवळपास चार बिबटे रेस्क्यू करण्यात आले. काल पांगरी शिवारातही भर दिवसा बिबट्याचा वावर आढळून आला. अशातच आता घोरवड घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याने प्राण गमावल्याची घटना समोर आली. मादी बिबट्या अंदाजे अडीच ते तीन वर्ष वयाची होती.

याबाबत स्थानिकांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शितल तांबे, बाबुराव सदगीर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बिबट्याला गंभीर दुखापत झालेली असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. मृत मादी बिबट्याला माळेगाव मोहदरी वनोद्यानात हलविण्यात आले आहे. येथे पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

हेही वाचा :

The post अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याने गमावला जीव appeared first on पुढारी.