अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाईची दुसऱ्या टप्प्यातील मदत प्राप्त; शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा 

देवळा (जि.नाशिक) : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी देवळा तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील १७ गावांच्या दोन हजार ४५९ शेतकऱ्यांना ८२ लाख ६४ हजार ७०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती देवळा तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी शुक्रवारी (ता.५) दिली. 

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे
जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात देवळा तालुक्यातील १८ गावांतील सुमारे तीन हजार ३२१ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण एक कोटी ३५ लाख ६६ हजार २५० रुपये मदत वर्ग करण्यात आली होती. आता नुकतीच दुसऱ्या टप्प्यात उर्वरित १७ गावांतील सुमारे दोन हजार ४५९ शेतकऱ्यांचे ८२ लाख ६४ हजार ७०० रुपये अनुदान प्राप्त झाले असून, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

पाच हजार ७८० लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर
जून ते ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या देवळा तालुक्यातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील एकूण पाच हजार ७८० लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी १८ लाख ३० हजार ९५० रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती देवळा तहसीलदार शेजूळ यांनी दिली. 

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

अतिवृष्टीमुळे खरिपाचे प्रचंड नुकसान झाले होते. खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढण्यासाठी शेतकरी अपार मेहनत घेत आहेत. परंतु, विपरीत हवामानामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साहजिकच उत्पादन खर्च वाढतोय. या सर्व पार्श्‍वभूमीवर मिळणारी ही मदत शेतकऱ्यांसाठी मोलाची ठरणार आहे. - गणेश शेवाळे, प्रहार शेतकरी संघटना, देवळा  