सिडको (नाशिक) : मारहाण झालेली महिला अंबड पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १०) रात्री संबंधिताविरोधात फिर्याद देण्यासाठी आली होती. ठाणे अंमलदारांनी तत्काळ फिर्याद घेऊन वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता त्या पिडीत महिलेसोबतच अन्याय झाल्याची घटना घडली आहे.
‘त्या’ पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करा - प्रहार जनशक्ती
मारहाण झालेली महिला अंबड पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १०) रात्री संबंधिताविरोधात फिर्याद देण्यासाठी आली होती. ठाणे अंमलदारांनी तत्काळ फिर्याद घेऊन वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता तिला तासन्तास अंबड पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. वेदनेने व्याकूळ असलेली महिला ‘मला त्रास होत आहे, मला लवकर दवाखान्यात घेऊन चला’ अशी याचना करीत होती. मात्र, ठाणे अंमदाराला तिची दया आली नाही. ‘आमच्याकडे वाहन उपलब्ध नाही’, असे सांगून तिला ताटकळत ठेवले. ठाणे अंमलदारावर कारवाई करून बडतर्फ करावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके यांनी ‘सकाळ’शी बोलताना केली.
हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार
एका महिलेला तिच्या नातेवाइकाने जबर मारहाण केली. ती महिला अंबड पोलिस ठाण्यात गेली. मात्र, पोलिसांनी सहकार्य केले नाही. या संदर्भात ठाणे अंमलदार व पोलिस निरीक्षक कमलाकर जाधव यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिले. महिलांबाबत गांभीर्याने न वागणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे. -दत्तू बोडके, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष
हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप
पोलिस गाड्या बंदोबस्तासाठी बाहेर असल्याने आम्ही त्या महिलेला मेडिकल करण्यासाठी सांगितले होते. या संदर्भात दत्तू बोडके यांचा फोन आला होता. त्यांनी पोलिस आयुक्तांना तक्रार करण्याचा दम दिला. तसेच ठाणे अंमलदारांनाही धमकी दिली. असे करणे चुकीचे असून, आमचे नेहमी महिलांना सहकार्य असते.
-कमलाकर जाधव, पोलिस निरीक्षक, अंबड पोलिस ठाणे
टाइमपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करावे
मारहाण झालेल्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याऐवजी तिला ‘पोलिस ठाण्यात गाडी नाही’ असे सांगून टाइमपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे निलंबन करावे, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके यांनी केली.