अदानी समुहाच्याविरोधात एलआयसीसमोर धुळे शहर काँग्रेसचे आंदोलन

धुळे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अदानी समुहाच्या महाघोटाळ्याविरोधात धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धुळे येथील एलाआयसी कार्यालयासमोर पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करुन सर्वसामान्य माणसाचा पैसा सुरक्षित करण्यात यावा अशी मागणी यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे यांनी केली.

देश आर्थिक संकटात असतांना केंद्रातील सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाचे प्रकल्प अदानी समुहाला विकण्याचा सपाटा लावला आहे. एलआयसी आणि स्टेट बँकेत सर्व सामान्य माणसाचा पैसा गुंतविलेला आहे. गोरगरिबांचा पैसा मोदी सरकारने जबरदस्तीने अदानी समुहात गुंतवायला लावला आहे. मात्र, आता अदानी समुहातील घोटाळा उघड झाल्याने गोरगरीबांचा पैसा बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. गोरगरिबांचा पैसा सुरक्षित रहावा म्हणून धुळे शहर काँग्रेसच्यावतीने धुळे शहरातील एलआयसी कार्यालयासमोर आज पर्दाफाश आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.अनिल भामरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस युवराज करनकाळ,ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, ज्येष्ठ नेते साबीर खान, सेवा दलाचे अध्यक्ष अलोक रघुवंशी, गायत्री जयस्वाल, छोटूभाऊ चौधरी, शकील अहमद, सुरेश बैसाणे, दिपक पाटील, जावेद देशमुख, मुकेश खरात, दिपक गवळे, समाधान मोरे, भटू महाले, प्रदिप कोळी, प्रा.जसपालसिंह सिसोदिया, पप्पू सहानी, नविद शेख, बाळु शिरसाठ, सौ.अर्चना पाटील, फारुक शेख, एस.पी.जाधव, सलमान मिर्झा, रिजवान अन्सारी, भगवान कालेवार, मुकुंद कोळवले, प्रकाश शर्मा, ईम्तियाज पठाण,बानुबाई शिरसाठ, साहिल कुरेशी, शकील शेख, वसीम सैय्यद, इसहाक मिर्झा, अशोक शिरसाठ, सुधीर जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा;

The post अदानी समुहाच्याविरोधात एलआयसीसमोर धुळे शहर काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.