अद्यापही ४१ टक्के पेरण्या बाकी, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

नाशिक : पेरण्या खोळंबल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील उत्तर भागात पावसाने ओढ दिली अशल्याने ब‌‌ळीराजाच्या पेरण्या खोळंबल्या आहे. दरवर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात होऊन पेरण्याला सुरुवात होत असते. यंदा मात्र जुलैचा अर्धा महीना उलटून गेला तरी पाहीजे तसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील बळीराजावर संकट ओढवले आहे, वातावरणाचा असाच खेळ सुरु राहीला तर दुबार पेरण्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बियाण्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात केवळ ५९ टक्केच पेरण्या झाल्या असल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यातील प्रमुख पिकांमध्ये भुईमुग, सोयाबीन, तुर, मका यांचा समावेश होतो. पावसामुळे जमिनीची पाहीजे तशी वाफ होत नसून त्यामुळे यंदा पेरण्या करता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातच बाजारामध्ये बियाणांचे भाव वाढत असल्यााने सरकारने याबाबत धोरण निश्चित करावे, असी देखिल मागणी शेतकरी करत आहे. सध्या राज्यात काही जिल्ह्यात पाउस सुरु आहे. मात्र नाशिकमध्ये देखिल पाउस सुरु झाला नसल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. यंदा अनेक वर्षांनंतर जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पेरणीची प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र त्यानंतर पावसाने दडी दिल्याने पेरण्या थांबल्या आहेत.

विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे जून महिन्यातील मृग नक्षत्रामध्ये पाऊस होत नव्हता. त्यामुळे कायम पेरणी लांबणीवर पडत असे. यंदा मात्र मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना आशा निर्माण झाली होती. परंतू त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.

.हेही वाचा : 

The post अद्यापही ४१ टक्के पेरण्या बाकी, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.