अधिकृत होर्डिंगधारकांना नेत्यांकडून धमक्या; पोलिस, महापालिका आयुक्तांकडे धाव 

नाशिक : शहरात सुरू असलेल्या ‘होर्डिंग वॉर’ आता थेट पोलिस व महापालिका आयुक्तांच्या दरबारात पोचले आहे. नियमित कर अदा करून राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचे फलक लावले जात असल्याच्या प्रकाराला नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने (नोवा) जोरदार विरोध करताना होर्डिंग्ज लावण्यास विरोध केल्यास धमकी दिली जात असल्याचा आरोप केला आहे. 

सध्या शहरात वाढदिवस, शुभेच्छा, तसेच जयंतीनिमित्त होर्डिंग्जबाजी सुरू आहे. सार्वजनिक जागांवर अनधिकृत शुभेच्छा फलक झळकवितानाच जे होर्डिंग्जधारक महापालिकेचा नियमित कर भरून व्यवसाय करत आहे त्यांच्या होर्डिंग्जवर देखील कोणाचीही परवानगी न घेता होर्डिंग्ज लावले जात असल्याने पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व नियमांची पूर्तता करून होर्डिंग्जच्या जागा निश्‍चित केल्या आहेत. होर्डिंग्जना परवाना क्रमांक असून, सर्व जाहिरात फलकांचा जाहिरात कर आणि परवाना शुल्क नियमितपणे वार्षिक आगाऊ स्वरूपामध्ये जमा केले जाते. त्यासंदर्भातील अधिकृत पावत्या, परवाना आहे. कोरोनामुळे जाहिरात व्यवसाय बंद होता. सध्या व्यवहार सुरू असले तरी कमी दरात जाहिरात प्रदर्शित केली जात आहे. त्यात आता शहरात मोठ्या प्रमाणात वाढदिवस, शुभेच्छा व जयंतीचे फ्लेक्स प्रदर्शित करून खासगी व्यावसायिक जाहिरात फलकांवर अतिक्रमण केले जात आहे. बळजबरीनेच फ्लेक्स लावून व्यावसायिक जाहिराती झाकल्या जात असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदन देण्यात आले. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

ठार मारण्याची धमकी 

राजकीय पक्षांकडून बळजबरीने लावलेल्या फ्लेक्समुळे ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. फ्लेक्समुळे होत असणाऱ्या शहर विद्रूपीकरणाला शहरातील काही प्रिंटर, माउंटर देखील जबाबदार आहेत. होर्डिंगधारकाने फ्लेक्स लावण्यास मनाई केल्यास ठार मारण्याची धमकी दिली जाते, असा आरोप संघटनेचे सचिन गिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात केला आहे. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी