अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा धडाका! एफडीए पथकाच्या हाती धक्कादायक गोष्टी

नाशिक :  राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला असून या कारवाईत अनेक धक्कादायक गोष्टी एफडीए पथकाच्या हाती लागल्या आहेत.

अनेक धक्कादायक वस्तू एफडीए पथकाच्या हाती 

एजाज काफील शेख (३२, रा. पठाणपुरा, चव्हाटा) असे संशयिताचे नाव आहे. ‘एफडीए’ला मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा टाकण्यात आला. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमरधाम रोडवरील उस्मानिया ट्रेडर्स दुकानाच्या पाठीमागील बाजूस खोलीची पथकाने तपासणी केली असता तेथे पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा मिळाला.

अडीच लाखांचा गुटखा जप्त 

राज्यात बंदी असलेल्या सुगंधी सुपारी आणि गुटखा विरोधी अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला असून, जुने नाशिक परिसरातील कथडा भागात टाकलेल्या छाप्यात अडीच लाखांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा एफडीए पथकाच्या हाती लागला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

घटनास्थळावरून सुमारे दोन लाख ६४ हजार ३८ रुपयांचा साठा जप्त केला असून, याप्रकरणी संशयिताविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई नाशिक विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे व अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर. डी. सूर्यवंशी, अमित रासकर, पी. एस. पाटील आदींच्या पथकाने केली.  

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा