अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी

शीतपेय

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा :

नंदुरबारमध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून थंड, शितपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी मोहिम सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत शीतपेय विक्री करणा-या आस्थापनांकडून थंड पदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत नंदुरबार येथे उन्हाळी मोहिमेत जिल्ह्यातील आईसक्रिम उत्पादक व थंड शीतपेय अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या मे.वाय.एल फुड प्रॉडक्टस, शहादा,मे.तमन्ना पान आणि कोल्ड्रीक्स, नंदुरबार, मे.नानक परमानंद मुलाणी,नंदुरबार, मे. भरकादेवी आईसक्रिम पार्लर, होळ तर्फे हवेली, नंदुरबार, मे.वृंदावन मिल्क प्रॉडक्स,कोटमाळ ता. नवापूर, मे.महाराजा बॉटलिंग प्लँट, शहादा, मे.श्र्वेता डिस्ट्रीब्युटर्स,नंदुरबार या शितपेय विक्री करणाऱ्या आस्थापनाकडून लस्सी, सोडा वॉटर, थंड शितपेय, टूटी फ्रुटी, पॅकेज ड्रिंकींग वॉटर, आईसक्रिम, कुल्फी या थंड पदार्थाचे 12 नमूने घेण्यात आले असून सर्व नमूने प्रयोगशाळेत विश्लेषणाकरीता पाठविण्यात आले आहे.

अहवाल प्राप्त झाल्यावर या आस्थापनावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारची नियमित कारवाई जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचेही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

हेही वाचा :

The post अन्न व औषध प्रशासनाला जाग ; नंदुरबारमध्ये थंड, शीतपेय पदार्थ विक्री करणाऱ्यांची तपासणी appeared first on पुढारी.