अन्यायाविरोधात सावरपाडा एक्सप्रेस धडकली थेट राजभवनात; राज्यपालांकडे मांडले गाऱ्हाणे

नाशिक : (पळसन) शासनाने खेळाडूंच्या कोट्यातून शासकीय सेवेत सामावून घेतांना अन्यायविरुद्ध दाद मागण्याकरीता सावरपाडा एक्सप्रेसने थेट राजभवनात धाव घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत आदिवासी दुर्गम भागातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत हिने आपले गा-हाणे मांडले आहे.

थेट राज्यपालांकडे मांडल्या व्यथा

कविता राऊत हिने निवेदनात म्हटले आहे की, मी आंतरराष्ट्रीय धावपटू असून शासकीय सेवेत नोकरी देण्यासाठी माझ्या नेमणूकीबाबत माझ्यावर
मोठ्या अन्याय झाला आहे. मी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू असून अनुसूचित जमातीची असून अनेकवेळा भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केलेले आहे. राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचे ट्रक इंवेटमध्ये महिलांमध्ये भारताचे पहिले पदक देखील प्राप्त केले आहे. तसेच आशिया स्पर्धेत व इतर ब-याच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके मिळविली आहे. २०१६च्या रियो ऑलिंपिकमध्ये मॅरेथॉन धावण्याच्या स्पर्धेत भारत देशाकडून सहभाग नोंदविला होता. शैक्षणिक पात्रतादेखील पदवीधर आहे. शासनाचे अनेक पुरस्कारदेखील प्राप्त केले आहेत. २०१४ पासून थेट शासकीय सेवेत नोकरी वर्ग एक मिळावी म्हणून अर्ज केला होता. शासनाच्या निर्णयानुसार मी शासकीय सेवेत थेट वर्ग-१ पदासाठी पात्र आहे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे नंतर अर्ज केलेल्या खेळांडूची नियुक्ती शासकीय सेवा वर्ग-१ मध्ये करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

माझ्यावर हा अन्याय का?

कमी खेळांमध्ये सहभागी होत कामगिरी करणा-या खेळांडूना शासकीय सेवेत सामावून घेतले. मी जिल्ह्यातील आदिवासी भागातून आंतरराष्ट्रीय पातळीवरपर्यंत नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. माझ्यावर हा अन्याय का? शासन निर्णयानुसार चार पदके मी जिंकली आहेत. तसेच माझ्याकडे शैक्षणिक पात्रता देखील आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके असूनही मात्र इतर खेळांडूकडे एक पदक असतांना महाराष्ट्र शासनात वर्ग-१ च्या पदासाठी थेट शासकीय सेवेत नियुक्ती केली जात आहे. माझ्याशी दुजाभाव केला जात आहे. अनेक वेळा पाठपूरावा देखील केला आहे. माझ्यासारखेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणा-या खेळांडूवर शासकीय सेवेत नोकरी मिळविण्यासाठी अन्यायाला सामोरे जातांना दिसत आहे.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

आदिवासी भागातील खेळाडूंवर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे राज्यपालांची भेट घेतली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या त्यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत. त्यांच्याकडून निश्चितच मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. - कविता राऊत

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार