..अन् शेतकरी ढसाढसा रडला : अवकाळी पावसाने द्राक्षांच्या मण्यांना तडे; एक ते दीड कोटीचे नुकसान

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : तळवाडे दिगर (ता,बागलाण) परिसरात सलग तीन दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी पाऊस व दाट धुक्याचा फटका बसून गावातील जवळपास ५० ते ६०  एकरावरील काढणी योग्य व काढणी सुरु असलेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन खराब झाले असून सुमारे एक ते दीड कोटीचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निसर्गाशी दोन हात करत प्रचंड मेहनत

यंदा लांबलेला पावसाला व त्यानंतरही दर महिन्यात होत असलेला वातवरणातील बदल यामुळे सुरुवातीपासूनच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निसर्गाशी दोन हात करत प्रचंड मेहनतीचे शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षांचे तयार केले होते. मात्र गेल्या तीन दिवसापासून तळवाडे दिगरसह प्रंचक्रोषित दाट धुके व अवकाळी पावसाच्या हलक्या सरी सुरूच असल्याने सलग दुसऱ्या वर्षीही शेतकऱ्याच्या हाततोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांना रडू कोसळत आहे.तळवाडे दिगर येथील भास्कर ठाकरे,पंकज ठाकरे,हेमंत पवार,मुरलीधर पवार,चंद्रकांत आहिरे,श्रावण ठाकरे,बाजीराव पवार,कृष्णा रौदळ,मंगेश पवार,भिका आहिरे,नामदेव आहिरे,लक्ष्मण पवार आदि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

वर्षभराचे कष्ट आणि ४ लाख रुपये खर्च दोन दिवसाच्या अवकाळीने माती

पोटच्या पोरांची नाही एवढी काळजी घेऊन तळवाडे दिगर येथील भास्कर मोठाभाऊ ठाकरे या युवा शेतकऱ्याने आपल्या तीन एकर क्षेत्रावरील सोनाका या जातीच्या द्राक्षांची लागवड केली आहे. त्यासाठी निर्सगाशी दोन हात करत ४ लाख रुपये खर्च करून उत्कृष्ट निर्यातक्षम द्राक्ष पिकवले होते व ९५ रुपये प्रतिकिलोने व्यापाऱ्यास दिले मात्र, उद्या सकाळी काढणीला सुरुवात होईल अशा परिस्थिती रात्रील झालेल्या हवामानातील बदल व अवकाळी पावसामुळे २० लाखापेक्षा जास्तीचे नुकसान झाले आहे.अशीच परिस्थिती गावातील सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे.

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा