अभीष्टचिंतन सोहळा : पिंपळगावला बनकर यांच्या नेतृत्वाची गरज

पिंपळगाव बसवंत www.pudhari.news

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळगावचे माजी सरपंच भास्करराव बनकर हे कुशल, सेवाभावी, कल्पक व दूरद़ृष्टी असलेले नेतृत्व असून, त्यांनी जनहिताच्या विविध योजना राबवून पिंपळगाव शहराचा विकास साधला. त्यांच्यामुळेच शहराला नावलौकिक प्राप्त झाल्याने त्यांचे नेतृत्व हे पिंपळगावकरांची गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अनिल कदम यांनी केले.

भास्करराव बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील प्रमिला लॉन्सवर आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शांताराम बनकर, नासाकाचे माजी संचालक पांडुरंग पिंगळे, मविप्रचे माजी संचालक दिलीपराव मोरे, सुरेश डोखळे, साहेबराव मोरे, चंद्रभान बोरस्ते, गोकुळ गिते, केशवराव बोरस्ते, काशीनाथ विधाते, राजेश पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी अ‍ॅड. शांताराम बनकर, अनिल कदम, दिलीपराव मोरे यांच्या हस्ते भास्करराव बनकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

माजी आ. कदम म्हणाले, निफाड फाटा ते एसटी डेपो या रस्त्याचे काम एक वर्षापासून सुरू आहे. वास्तविक हे दर्जेदार काम एक महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र निकृष्ट, नियोजनशून्य व संथ गतीच्या कामामुळे पिंपळगावकर नाराज असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी भास्करराव बनकर यांनी गत पाच वर्षांत बाजार समितीला करमाफी दिल्यामुळे पिंपळगाव ग्रामपंचायतीचे एक कोटी 10 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. दुसर्‍या बाजूला आज ग्रामपंचायतीची दोन-अडीच कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे. हा प्रकार केवळ नियोजन नसल्याने होत असून, विकास थांबल्याची खंत बनकर यांनी व्यक्त केली. यावेळी अ‍ॅड. शांताराम बनकर, दिलीपराव मोरे, पांडुरंग पिंगळे, रामराव डेरे, सुहास मोरे यांनी मनोगतातून भास्करराव बनकर यांच्या कार्याचा गौरव केला. दरम्यान, परिसरातील विविध संस्था, नागरिक, हितचिंतकांनी भास्करराव बनकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. अभीष्टचिंतन सोहळ्यास मातोश्री चंद्रभागाबाई बनकर, साहेबराव डेरे, विनायक खोडे, सोमनाथ मोरे, रामविलास बुब, पांडुरंग चव्हाण, श्रीनिवास गवळी, बाळासाहेब विधाते, गणपतराव विधाते, रमेश विधाते, दत्ता गडाख, ज्ञानेश्वर चव्हाण, संजय वाघ, चंद्रकांत बनकर, ईश्वर बोथरा, राजेंद्र विधाते, आरिफ काझी आदींसह नागरिक उपस्थित होते. संजीव देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post अभीष्टचिंतन सोहळा : पिंपळगावला बनकर यांच्या नेतृत्वाची गरज appeared first on पुढारी.