अमरनाथ यात्रेत नाशिकच्या महिलेचा हृदयविकाराचा झटका आल्‍याने मृत्यू

जम्मु - काश्मीर

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : जम्मु-काश्मीर येथील अमरनाथ यात्रेत दर्शनासाठी गेलेल्या पंचक गावातील रंजना रामचंद्र शिंदे (वय ५६) या महीला भाविकाचा बुधवारी ( दि.२० ) अमरनाथ यात्रेदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्‍याने निधन झाले. त्यांचा मृतदेह गावी विमानाने आणला जाणार आहे.

रंजना शिंदे या आपले पती रामचंद्र शिंदे, भाऊ अजित बोराडे, बहीण बेबीताई खताळे, लताबाई बोराडे यांच्यासोबत (दि.१५ जुलै) रोजी अमरनाथ यात्रेसाठी नाशिक येथून रवाना झाल्या होत्या .बुधवारी अमरनाथ दर्शनासाठी जात असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.

अमरनाथ डोंगरावरती जात असताना त्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्‍यांचा मृतदेह विमानाने नाशिकला आणला जाणार आहे अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

हेही वाचा

The post अमरनाथ यात्रेत नाशिकच्या महिलेचा हृदयविकाराचा झटका आल्‍याने मृत्यू appeared first on पुढारी.