अरेच्चा! दोन हजारांची नोट गेली कुठे? नोटेचे दर्शन दुर्लभच

नाशिक : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने दोन हजारांची नोट आर्थिक व्यवहारात आणली. अनेकानी त्यास असमर्थता दर्शविली होती. त्यानंतरही मोठ्या प्रमाणावर नोटेची छपाई झाली. अशी ही नोट गेल्या महिन्यापासून बाजारात दिसेनाशी झाली आहे. बॅंकेच्या व्यवहारातही दोन हजारांच्या नोटेचे दर्शन दुर्लभ झाले आहे. पाचशे, शंभर रुपयांच्या नोटेचा सध्या चलनात अधिक वापर आहे. 

दोन हजारांची नोट बाजारातून दिसेनाशी! 
काही महिन्यांपासून लॉकडाउनच्या पूर्वीपासूनच बाजारात दोन हजारांची नोट दिसेनाशी झाली. अगदी ठराविक प्रमाणातच कुठेतरी नोट बघवायास मिळत आहे. दुसरीकडे त्यांची छपाईदेखील बंद आहे. पूर्वी चलनात असलेल्या दोन हजारांच्या नोट बाजारात दिसत नाही. तर मग त्या गेल्या तरी कुठे, असा प्रश्‍न सर्वांना पडत आहे. चलनात घटलेल्या प्रमाणामुळे काही बॅंकेच्या एटीएममधून दोन हजारांचा कप्पादेखील काढण्यात आला की काय, असे भासत आहे. एटीएममधूनही पाचशे आणि शंभराच्या नोटाच बाहेर येत आहेत. अनेकांनी बऱ्याच महिन्यांपासून दोन हजारांची नोटही बघितली नसल्याचे सांगितले. दोन हजारांच्या नोटेपेक्षा एक हजाराची नोट बरी असल्याचेही सांगण्यात आले. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

नोटाबंदीची धास्ती 
केंद्र सरकारतर्फे अचानक नोटाबंदी केली होती. बराच काळा त्याचा परिणाम नागरिकांना सोसावा लागला. काही व्यावसायिक, व्यापारी अजूनही त्यातून सावरलेले नाहीत. त्यातच काही महिन्यांपासून बाजारात दोन हजारांची नोट दिसत नाही. पुन्हा नोटाबंदीचे संकेत तर नाही ना असा प्रश्‍न नागरिक, व्यावसायिक उपस्थित करत आहे. कुठे तरी त्यांच्यात धास्ती निर्माण झालेली दिसत आहे. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

पाचशे, शंभरच्या नोटांचा बोलबाला 
दोन हजारांच्या नोटेचे चलनातील प्रमाण नगण्य झाल्याने पुन्हा आर्थिक व्यवहाराची मजल पाचशे आणि शंभरच्या नोटेवर आली आहे. नोटाबंदीच्या पूर्वीही याच नोटाचा अधिकतम वापर होता. मग नोटाबंदीने सरकारला काय साध्य झाले, नोटाबंदी केली नसती. तर देशात आर्थिक व्यवस्थेवर परिणाम तर झाला नसता, असे व्यावसायिकांकडून अनेकदा बोलले जाते. 

बाजारातील चलनात दोन हजारांच्या नोटेचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. बॅंकेतही नाहीच्या प्रमाणात दोन हजारांच्या नोटेचा भरणा येत आहे. 
- नासीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी, फैज बॅंक