अरेच्चा! नियम एक असूनही दंडाची शिक्षा मात्र नाशिक-मुंबईत वेगवेगळी? गोंधळात गोंधळ

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रसारासंदर्भात जनतेला संबोधीत केले होते. त्यावेळी जनतेला सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर यांसह विविध सूचना केल्या होत्या. त्यानुसार सोमवार (ता.२२) पासून रात्रीची संचारबंदी आणि विनामास्क फिरणारे नागरिक यांच्यावर कारवाई सुरु झाली. मात्र त्यात गोंधळ प्रकर्षाने आढळून आला. ळ राज्यातही अनेक ठिकाणी दिसला.

चर्चेचा विषय! हा गोंधळ राज्यात अनेक ठिकाणी
कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी रात्रीच्या संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. विनामास्क फिरणा-यांवर कारवाई सुरु झाली आहे. मात्र या कारवाईत दंडाची रक्कम मात्र भिन्न आहे. नाशिकला विनामास्क आढळलात तर हजार रुपये दंडाशिवाय सुटका नाही. मुंबईला मात्र त्यासाठी अवघे दोनशे रुपये दंड केला जात असल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. नाशिक महापालिकेकडून एक हजार रुपये तर मुंबई महापालिकेकडून दोनशे रुपये दंड आकारला जात आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे. एक हजार रुपये दंड करण्याचे परिपत्रक अनेकांना मिळालेले नसल्याने हा गोंधळ उडाल्याचे दिसते.

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले

नाशकात मुंबईच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी; तरीही ५ पट दंड 
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक नियम कडक करण्यात आले. मात्र त्यात एकवाक्यता नसल्याचे पुढे आले आहे. मास्क न घातल्यास दंड आकारणीचे अधिकार महापालिकांना दिले आहे. त्या अधिकारांचा सोयीने वापर सुरू झाला आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेचे मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड आकारला जातो. भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत मात्र थेट 1000 रुपये म्हणजे पाच पट अधिक दंड आकारला जातो. शिवसेना आणि भाजप अशा दोन राजकीय पक्षाच्या अधिकारात दोन वेगवेगळे नियम अनुभवास मिळत आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंड आकारणीचे अधिकार ज्या महापालिकांना आहे. त्यासाठी मुंबई महापालिका अधिनियम एकच आहे, असे असताना हा फरक आहेच. पण कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या तुलनेतही नाशिक शहरात मुंबईच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी आहे. नाशिकमध्ये मुंबईच्या तुलनेत पाच पट दंड आकारणी होत असल्याने तो टिकेचा विषय झाला आहे.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ