अरेच्चा! हे वर्तमानपत्र कि लग्नपत्रिका? मालेगावात चर्चेचा विषय 

मालेगाव (जि.नाशिक) : ‘सकाळ’चे मालेगावचे बातमीदार प्रमोद सावंत यांची कन्या भाग्यश्रीच्या लग्नाची अनोखी पत्रिका सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे. सध्या ही  लग्नपत्रिका सर्वांचेच लक्ष वेधून घेतेय..

घटना, घडामोडींचा आढावा
कसमादेसह खानदेश भागात लग्नपत्रिकेत मानकरी, पाहुण्या-रावळ्यांसह राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांच्या नावांची जंत्रीच असते. पदांच्या बिरुदावलीमुळे लांबलचक मोठ्या आकाराची पत्रिकाही असते. सावंत यांनी पत्रकारितेत ३० वर्षे समाजातील घटना, घडामोडींचा आढावा घेतला. पत्रिका न छापता समाज माध्यमातून आमंत्रण देणारी वर्तमानपत्राच्या पद्धतीने मांडणी केली. समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी पत्रिकेचे कौतुक केले.

May be an image of 3 people

VIDEO : "मास्क काढ तो" राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

व्हॉट्सॲप लग्नपत्रिकेला सध्या सुगीचे दिवस

गावोगावी सर्वदूर पत्रिका घेऊन आमंत्रण करण्याच्या किचकट परंपरेला छेद दिला. विशेषतः आर्थिकपेक्षा वेळेची बचत झाली. श्री. सावंत यांचे भाचे तेजस कोर यांच्या संकल्पनेतून पत्रिकेची निर्मिती झाली. ‘शुभ समाचार’ टायटलने निर्मित पत्रिकेची आकर्षक रचना केली आहे. डिजिटल युगात बनविलेल्या व्हॉट्सॲप लग्नपत्रिकेला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. 

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

श्रम, वेळेच्या बचतीबरोबर वेगळा पायंडा निर्माण केला. धावपळीच्या युगात एका जागेवरून फोन व व्हॉट्सॲपवर आमंत्रित करता आले. 
-प्रमोद सावंत, वधू पिता 

 

लग्नसोहळा म्हटला की वेगळेपण आले. तंत्रज्ञानाच्या क्रांतीत घरातील पहिले लग्न असल्याने वेगळ्या धाटणीची पत्रिकेची मांडणी केली. 
-तेजस कोर, पत्रिका डिझायनर