अल्पवयीन मुलीला पळविणारा अखेर ताब्यात; राजूर येथून पकडले

नाशिक रोड : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणारा सराईत सुगंध निर्मळ यास उपनगर पोलिसांनी राजूर (ता. भोकरदन) येथून अटक केली.

अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची तक्रार उपनगर पोलिसांत काही दिवसांपूर्वी दाखल होती. याबाबत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तांत्रिक साधनांचा वापर करून संशयित निर्मळपर्यंत पोचले. त्याला हतनाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजूर येथून ताब्यात घेतले गेले. त्याच्याबरोबर अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतले आहे. याबद्दल अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांसह वरिष्ठांनी पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचे अभिनंदन केले.  

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह