खामखेडा (नाशिक) : सावकी व खामखेडा परिसरात दोन दिवसांपासून लागोपाठ पाऊस झाल्यामुळे कांदा व गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सावकी येथील दिलीप कुलकर्णी यांचा एक एकर ४० गुंठे गहू भुईसपाट झाला आहे.
पिकावर मावा तसेच तुडतुडे यांचा प्रादुर्भाव
पावसामुळे बुरशीचे प्रमाण वाढल्यामुळे लागवड केलेल्या उन्हाळ कांद्याचे नुकसान होत आहे. नोव्हेंबरमध्ये लागवड केलेल्या गहू, हरभरा या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गहू जोरदार पावसामुळे भुईसपाट झाला असून, ढगाळ हवामानामुळे या पिकावर मावा तसेच तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा
अर्ली द्राक्ष उत्पादकांचे शंभर टक्के नुकसान
चार-पाच दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी, दाट धुके व दव असल्याने काढणीला आलेल्या द्राक्षबागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या बागांमध्ये व्यापारी खरेदीसाठी फिरत होते. तर अनेक शेतकऱ्यांचे बाग देऊन झाले असतांना शेतकऱ्याच्या हाततोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबात सुतकासारखी परिस्थिती आहे. वाजगाव येथील बळीराम देवरे, गोविंद देवरे, भूषण देवरे, प्रदीप देवरे, प्रमोद देवरे, अमोल देवरे, राजेंद्र देवरे, साहेबराव देवरे, गोटू देवरे, आबा सावकार, राहुल देवरे, महेश देवरे आदी शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात