अवकाळीने चुकविले भातपिकाचे आर्थिक गणित; आता ढगाळ वातावरणाचा धोका

इगतपुरी (नाशिक) : गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान केले. आता पीक काढण्याच्या वेळेस पुन्हा ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. इगतपुरी तालुक्यातील भातशेतीला यंदा नैसर्गिक वातावरणाने चांगलाच तडाखा दिला आहे. 

आता ढगाळ वातावरणाचा धोका 

इगतपुरी तालुक्यात भातपीक घेतले जात नसले तरी उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी किरकोळ शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे बियाणे टाकले. पहिल्या वेळेचे बियाणे टाकले आणि उगवले नाही. पावसामुळे ते दाबले गेले. खरिपातील पिकांची काही शेतकऱ्यांनी कापणी केलेली होती, तर काही शेतकरी कापणीच्या तयारीत होते; परंतु अचानक अवकाळी पावसाने दहा-बारा दिवस धुमाकूळ घातल्याने शेतात कापणी केलेल्या पिकांना अंकुर फुटले आणि जास्त दिवस शेतातच पडून राहिल्याने दाणे काळे पडले. उभी असलेली पिके शेतात जास्त पाणी झाल्याने सडून गेली आहेत. 

हेही वाचा > सोन्याचे बिस्किट हाती लागले पण श्रीमंत होण्याचे स्पप्न भंगले!

हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता

उरलीसुरली पिके काढण्याची तयारी सुरू असताना दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने पुन्हा एकदा शेतकरी धास्तावले आहेत. आधी अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले. आता उरलेसुरले भातपीक सोंगणीवर आले असतानाच काही ठिकाणी पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. या चिंतेत असतानाच दोन दिवसांपासून अचानक ढग आल्याने चितेंचे ढग गडद झाले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा > 'आज कुछ तुफानी' करणे चांगलेच भोवले! तब्बल सहा तासांनंतर भावंडांची सुटका