अवकाळीमुळे रब्बीचे शेतकरी चितांतूर; गहू, हरभरा, वाल मसुरासह पालेभाज्यावर परिणाम 

खेडभैरव (नाशिक) : इगतपुरी तालुक्यासह पूर्व भागातील पिंपळगाव मोर, टाकेद, खेड, धामणी, धामणगाव, अधरवड परिसरात गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात बदलाचा परिणाम पिकांवर झाला आहे. रविवारी रात्री व सोमवारी परिसरात पावसामुळे पेरणी झालेल्या हरभरा, गहू, वाल, मसूर लागवडीसह टोमॅटो, वांगी आदी भाजीपाला पिकांवर ढगाळ वातावरणाचा व अवकाळीचा प्रतिकूल परिणामाच्या शेतकरी चिंतेत आहे. 

रब्बीवर परिणाम 

परतीच्या पावसाळी झालेल्या प्रचंड अवकाळी पावसामुळे मुख्य भात पिकाचे नुकसान होऊन रब्बीची पेरणीही लांबली होती. अशाही अडचणीत शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. तर काही ठिकाणी शेतकरी पेरणीच्या तयारीत असतांना पाउस, ढगाळ वातारणामुळे अजूनही पेरणी लांबणार आहे. तर पेरणी होऊन उगवलेल्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होती आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ

- वाफसा गेल्याने भाजीपाला लागवड उशीरा 
- रब्बी पिकांच्या लागवडीसाठी उशीर होणार 
- शेतकऱ्यांनी तयार केलेली रोपे वाया जाणार 
- जनावरांचा चारा भिजल्याने मोठे नुकसान 

दोन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पेरणी केलेल्या रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत असून जमिनीतला वाफसा उडाल्याने भाजीपाला पीके लागवडीसाठी उशीर होणार आहे. रोपे वाया जाणार आहेत. 
- भगवान पारधी,शेतकरी, खेडभैरव ता. इगतपुरी 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा