अवकाळी पावसामुळे पाणावले शेतकऱ्यांचे डोळे; दिंडोरी तालुक्यातील द्राक्षबागा धोक्यात 

दिंडोरी, वणी (जि. नाशिक) : तालुक्यात शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी सहाला अवकाळी पावसाने झोडपले. यात द्राक्ष, गहू, हरभरा आदी रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात पूर्व भागात द्राक्षाची नव्वद टक्के द्राक्षशेती आहे. पावसाने सायंकाळी सहाला चांगलेच झोडपले. गुरुवारी रात्री आठला पाऊस झाला. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शेतकरी द्राक्षशेतीत बुरशीजन्य औषधांची फवारणी करत होते.

शेतकऱ्यांचा औषधांची फवारणी खर्च वाढला 

पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठ्या प्रमाणात मणीगळ व घडकुज होऊन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. काही शेतकऱ्यांनी घडांना कागद लावले आहेत, तेही पावसामुळे ओले झाले आहेत. पश्चिम पट्ट्यातही गहू हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत मोहाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सचिन जाधव ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, की या पावसाने शेतकऱ्यांचा औषधांची फवारणी करण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या द्राक्ष शेतीची कामे शेवटच्या टप्प्यात आली असताना निसर्ग ही सध्या साथ देत नसल्याने द्राक्षशेती सध्या अडचणीची ठरत आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! एका मित्राला लागली हळद ,तर दुसऱ्याला दिला अग्नि; अक्षयच्या अवेळी जाण्याने परिसरात हळहळ

दिंडोरीत अवकाळीने द्राक्षबागा धोक्यात 

दिंडोरी तालुक्यात आर्ली छाटलेल्या द्राक्षबागामध्ये पाणी उतरून पूर्ण साखर आलेली आहे. या द्राक्षबागा विकण्यासाठी पूर्ण तयार झाल्या असून, पावसामुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्या द्राक्षबागेतील घड पेपरने झाकलेले आहे, आशा घडांमध्ये पाणी गेल्यास मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पेपर जास्त प्रमाणात ओला झाल्यास द्राक्ष मण्यावर काळे डाग पडतात. कोरोनामुळे मागील हंगामात द्राक्ष बागायतदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतक-यांना भांडवलदेखील तयार करता आलेले नाही. शेतक-यांनी द्राक्ष फेकून दिलेले असून पुन्हा चालू वर्षी अवकाळीने फटका बसत असल्याने मोठे आव्हान ठरले आहे. सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागांना पूर्ण खर्च करून झालेला आहे.  

हेही वाचा > माहेरहून सासरी निघालेली विवाहिता चिमुकलीसह प्रवासातच गायब; घडलेल्या प्रकाराने कुटुंबाला धक्काच