अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

अंतापूर (जि.नाशिक) : दोन दिवस अगोदरच या घरात मुलीचे लग्न पार पडले. लेकिच्या लग्नाचा मांडव उतरत नाही तोच शुभ कार्याच्या आनंदावर विरजण पडले. आणि क्षणात अवघा गाव शोकसागरात बुडाला. जणू बापाचे कर्तव्य पार पाडत तो स्वर्गयात्रेला निघाला..काय घडले नेमके?

मुलीच्या लग्नानंतर दोन दिवसातच पिता जग सोडून गेला..

दोन दिवस अगोदर मुलीचे लग्न झाले होते. लेकीचे लग्न उत्तमरित्या पार पडले म्हणून संपूर्ण भोये कुटुंब आनंदात होते. पण क्षणार्धात त्या सुखाला कोणाची तरी नजर लागली. मोहोळांगी (ता. बागलाण) येथील सामाजिक कार्यकर्ते पंडित केशव भोये (वय ५६) यांना अचानक छातीत कळ आल्याने नाशिक येथील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पंडित केशव भोये हे ग्रामपंचायत सदस्य उत्तमराव भोये यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश