अवैध धंदे करणाऱ्यांना पंचवटी पोलिसांचा दणका; २९ जणांना अटक 

म्हसरूळ (नाशिक) : शहर परिसरातील अवैध दारू आणि जुगार, मटक्यांच्या अड्ड्यांवर पंचवटी पोलिसांनी धडक कारवाई करत दोन महिन्यांत तब्बल २९ जणांना अटक करून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलिस आयुक्त दीपक पांडेय, उपआयुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांनी अवैध दारू विकणारे आणि जुगार, मटका अड्डे चालविणाऱ्या संशयितांवर कारवाई करण्यासाठी वॉरंट काढले होते. त्यानुसार पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार यांच्या पथकाने जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत धडक कारवाई केली. शहरात जुगार व मटक्याच्या तीन अड्ड्यांवर कारवाई करत २५ संशयितांना अटक केली आहे. तसेच, त्यांच्याकडून ९० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अवैध दारूविक्री प्रकरणी ४ अड्ड्यांवर कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण ५५ हजार ४१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

हेही वाचा - पोलिसांवर आरोप करत नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या; आत्महत्येपूर्वीचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल​

अवैध दारू विक्री प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना कळविण्यात आले आहे. तसेच, मटका व जुगार अड्डे सुरू असलेल्या जागेतील नळ आणि लाइट कनेक्शन व अन्य कारवाई संदर्भात महापालिका, महावितरण कार्यालयांकडे पत्रव्यवहार केला आहे. 
- अशोक भगत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पंचवटी. 

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा