आंतरराष्ट्रीयस्तरावर नाशिकच्या कलाकारांची छाप

डान्स www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या रूपाने नाशिकचे नाव चित्रपट पर्यायाने अभिनय आणि संबंधित क्षेत्रात जगभर पोहोचलेले असून, आजही नाटक, नृत्य या सारख्या कला प्रकारांत नाशिकच्या कलाकारांचा दबदबा कायम असल्याची प्रचीती नुकत्याच थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत आली. यात नाशिकच्या सायक्लॉन ग्रुप डान्स अकॅडमी चॅरिटेबल सोसायटीच्या कलाकारांनी सादर केलेल्या समूह नृत्याला द्वितीय क्रमांकाचे परितोषिक मिळाले आहे.

थायलंड येथे झालेल्या इंडिया इंटरनॅशनल ग्रुवी फेस्ट सिझन- 4 मध्ये 12 देशांतील 250 कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यात प्रारंभी 20 टॉप ग्रुपची निवड करण्यात आली. त्यानंतर झालेल्या अंतिम फेरीत नाशिकच्या कलाकारांनी आपला कलाविष्कार सादर केला. त्यात 1857 ते मधील सारागडी किल्ल्यावरील 10 हजार अफगाणी सैन्याला केवळ 21 भारतीय शिखांनी लढत दिलेल्या बहादुरीची गौरव गाथा पासून अलीकडील उरीच्या मिशनमध्ये पाकिस्तानी सैन्याला धूळ चारणार्‍या भारतीय सैनिकांचा गौरवशाली इतिहास नृत्याविष्कारातून दाखविला. भारतीय स्वातंत्र्यांच्या 75 व्या महोत्सवाचे औचित्य साधून देशातील वीरमरण आलेल्या सैनिकांना समर्पित असे सादरीकरण या कलाकारांंनी केले. या सादरीकरणाला परीक्षकांनी स्टॅण्डिंग ओव्हेशन दिले. या कलाकृतीस संस्थेचे नृत्यदिग्दर्शक जतींदरसिंग चिंकी यांना उत्तम कोरिओग्राफी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. कलाकारांमध्ये जितेंदर सिंग, रशिका सातार्डीकर, श्वेता तांदळे, वैदेही साखरे, सोमदीप दास, मयुर शर्मा, अ‍ॅड. लीना शेख यांचा समावेश आहे. या टीमसोबत अनुज कलंत्री, समीर सिंधवा, देव विसे यांनी परिश्रम घेतले. या कलाकारांमधील एका गरजू प्रतिभावान मुलीचा संपूर्ण खर्च अकॅडमीच्या वतीने करण्यात आला. यासाठी ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शाह, गोल्डी आनंद शोभा सोनवणे, पोलिस निरीक्षक , डॉ. शशी आहिरे, लीना शेख यांनी सहकार्य केले.

हेही वाचा:

The post आंतरराष्ट्रीयस्तरावर नाशिकच्या कलाकारांची छाप appeared first on पुढारी.