आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनविशेष : सहा फ्लॅट विकून केला साडेचार हजार दुर्मीळ शस्त्रास्त्रांचा संग्रह

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनविशेष, www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ

संग्रह करण्याचा हेतू हा छंद किंवा जमा केलेला संग्रह भविष्यात इतरांच्या कामी यावा, त्यातून लोकांना एेतिहासिक माहिती मिळावी, या हेतूने काही लोक झटतात. नाशिकमधील आनंद ठाकूर २०१४ पासून दुर्मीळ शस्त्रास्त्रांचा शोध घेऊन त्यांचा संग्रह करत आहेत आणि अजूनही त्यांचे काम सुरूच आहे. या आवडीपोटी त्यांनी ६ फ्लॅट विकून भारतातील ४५०० दुर्मीळ शस्त्रांचा संग्रह केला आहे. राजस्थान, हैदराबाद, उदयपूर, पंजाब, इंदोर, उज्जैन सारख्या ठिकाणांहून शस्त्र विकत घेतली आहेत.

सुरुवातीच्या काळात किल्ले राजघराण्यातील लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आवडीची कल्पना दिली तसेच भंगार गोळा करणारे त्यांना पैसे देऊ केले की ते माहिती पुरवतात. अशा रीतीने शस्त्र जमा होत गेली. परंतु विकत घेतली जाणारी शस्त्र खरे की खोटे, त्याची पारख कशी करायची? यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता फार असते. त्यासाठी काही ट्रिक असतात. एखादे दुर्मीळ शस्त्र घ्यायचे म्हटले तरी लाखभर रुपये माेजावे लागतात. ठाकूर यांनी कुऱ्हाडी, बंदूक, हैदराबाद निजामाची वंशकालीन तोफ त्यावर मुस्लीम आरक्षण मंत्र लिहिलेला आहे. चिलखत, दानपट्टे, खंजीर, बारूद दाणी, अडकित्ता, वाघनखे, शिरस्त्रान, मुघलकालीन खंजीर, तलवारींमध्ये राजा-राणी तलवार, मराठा तलवार, सिंह, घोडा, हत्ती असणाऱ्या अशा एकूण ५०० तलवारी, दांडपट्टा, छडीपट्टा, ८० कट्यार, १५० भाले, १७५ अडकित्ते, ४० परशू, २ धनुष्यबाण आणि ७०० देवांच्या रेखीव मूर्ती आहेत, ज्या आजच्या काळात शोधूनही सापडणार नाहीत. असा दुर्मीळ संग्रह त्यांनी केला आहे. हा संग्रह ठेवण्यासाठी ॲण्टिक पेट्या तसेच खोके बनवून घेतले आहेत. ठाकूर यांची पूर्ण खोली शस्त्रास्त्रांनी भरलेली आहे.

भारतातील दुर्मीळ शस्त्रास्त्रांचा ठेवा नागरिकांना पाहता यावा म्हणून त्र्यंबकेश्वर येथे संग्रहालय सुरू करायचे आहे. पण पैशांअभावी पुढील काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे सुरुवातीला पत्र्यांचे शेड उभारून, सीसीटीव्ही कॅमेरे लावून संग्रहालय सुरू करण्याचा मानस आहे.

– आनंद ठाकूर

हेही वाचा :

The post आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनविशेष : सहा फ्लॅट विकून केला साडेचार हजार दुर्मीळ शस्त्रास्त्रांचा संग्रह appeared first on पुढारी.