Site icon

आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत नाशिकच्या कौसल्या पवारला कांस्यपदक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पंजाब येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला खो-खो स्पर्धेत पुणे विद्यापीठाच्या महिला संघाला तृतीय स्थान मिळाले. या संघात नाशिकची खेळाडू कौसल्या पवार हिची निवड झाली होती. तिच्या अष्टपैलू कामगिरीमुळे पुणे संघाने कांस्यपदक मिळविले. कौसल्याने यंदा खेलो इंडिया महिलांच्या राष्ट्रीय खो-खो लीग व पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक, तर महिलांच्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. यंदा तिने दोन सुवर्ण, एक रौप्य, तर एक कांस्य पदकाची कमाई केली. तिला गीतांजली सावळे आणि उमेश आटवणे यांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, आजीवन अध्यक्ष रमेश भोसले, आनंद गारमपल्ली, सुनील गायकवाड आदींनी कौतुक केले.

हेही वाचा:

The post आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत नाशिकच्या कौसल्या पवारला कांस्यपदक appeared first on पुढारी.

Exit mobile version