आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

नाशिक : दोन कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याने पालिका मुख्यालयासमोर दोन्ही रुग्णांनी ठिय्या दिल्याचा प्रकार बुधवारी (ता. ३१) घडला होता. त्यानंतर आता आंदोलन करणाऱ्या एका रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. पतीच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दोषी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या पत्नीची मागणी केली आहे. 

दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी
पतीच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दोषी डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या पत्नीची मागणी केली आहे. 

मदतीसाठी नाईलाजानेच महापालिकेत ठिय्या

दोन लहान मुलांची जबाबदारी महापालिका प्रशासनाने घ्यावी, मयत रुग्णाच्या पत्नीने कैफियत मांडली आहे. 3 दिवस अनेक रुग्णालयात फिरूनही बेड मिळाला नाही, मदतीसाठी नाईलाजाने महापालिकेत ठिय्या द्यावा लागल्याचे रुग्णाच्या पत्नीने सांगितले. बिटको रुग्णालयातही व्हेंटिलेटर बेडची गरज असतांनाही पतीला ऑक्सिजन बेडवर ठेवल्यानं योग्य उपचाराअभावी पतीचा मृत्यू झाल्याचं पत्नीचं म्हणणं आहे.

हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड

सामाजिक कार्यकर्ते ढोके यांच्यावर गुन्हा दाखल?

भाऊसाहेब गोळे (वय 39) असे कोरोनाबाधिताचे नाव असून त्या रुग्णाला सार्वजनिक ठिकाणी आंदोलन करायला लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते दीपक ढोके यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे समजते. सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी सिडकोच्या कामटवाडे व डीजीपीनगर भागातील प्रत्येकी एक अशा दोन रुग्णांना बेड मिळत नसल्याची तक्रार करत बुधवारी (ता. ३१) थेट महापालिका मुख्यालयाबाहेर बसविले होते. यातील एका रुग्णाने ऑक्सिजन सिलिंडरसह ठिय्या दिला. ऑक्सिमीटरद्वारे रुग्णाची तपासणी केली असताना ३६ टक्के ऑक्सिजन लेव्हल दर्शविली जात असल्याचे डोके यांनी दाखविले. जिल्हा रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी घेऊन गेल्यानंतर महापालिकेच्या बिटको व झाकिर हुसेन रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला जातो. मात्र तेथेही बेड शिल्लक नसल्याचे उत्तर दिले जात असल्याचा दावा डोके यांनी केला होता. 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण 

कोरोना प्रादुर्भाव आणि रुग्णांची स्थिती चव्हाट्यावर

ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णाला बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. (ता.१) एप्रिलला पहाटेच्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.