आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताच्या मृत्यूची होईल चौकशी – छगन भुजबळ

नाशिक : महापालिकेत बेड मिळाला नाही म्हणून महापालिकेवर मोर्चा काढावा लागलेल्या घटनेची पोलिस चौकशी होईल. त्यात, बेड देण्यात टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. 

आधी जाहीर करू, मग लॉकडाउन करू 
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अन्यथा लॉकडाउनशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा श्री. भुजबळ यांनी २६ मार्चला झालेल्या बैठकीत दिला होता. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. १) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीतील निर्णयाकडे लक्ष लागून होते. लॉकडाउन करणार नाही, करायचा असेल त्या वेळी आधी तीन दिवस लोकांना माहिती दिली जाईल, असे भुजबळ म्हणाले.

होम क्वारंटाइन रुग्ण शोधून काढले पाहिजेत
भुजबळ म्हणाले, की खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. होम क्वारंटाइन रुग्ण शोधून काढले पाहिजेत २२८ पैकी १४ बेड वापरले जातात. त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा. ३०० बेड सिव्हिलमध्ये तयार करायला सांगितले आहे. 

हेही वाचा - आंदोलनास बसलेल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू प्रकरण : दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पत्नीची मागणी

बेड असून दिले नाही तर कारवाई

नाशिक महापालिका बिटको रुग्णालयात खाटा वाढवून पाच दिवसांत एक हजार बेडची सोय करावी. मविप्र बेड मिळणार आहे. बिटको रुग्णालयात जुन्या कोर्टाच्या इमारतीत सोय करता येईल का हे पहिले जाईल. होम क्वारंटाइन रुग्णाची माहिती घ्यावी. कलेक्टर, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांना रोज अर्धा दिवस रस्त्यावर काम करायला सांगितले आहे. बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड वाढवायला सांगितले आहेत. जेथे बेड असतील तेथे रुग्णांना जावे लागेल पण बेड असून दिले नाही तर कारवाई होईल. तीन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन आढावा घेतला जाईल. महापालिकेत बेडसाठी आंदोलन करण्याची वेळ आलेल्या मृत रुग्णाला कुणी बेड नाकारले त्याची चौकशी होईल. रुग्णाला बेड देण्यात टाळाटाळ केली असल्यास त्यांची चौकशी होईल. 

हेही वाचा - दशक्रिया विधीत अश्रू पुसण्यासाठी धावले 'माकड'! लॉकडाउनमधील दोन घासांची ठेवली कृतज्ञता

भुजबळही हतबल 

महापालिकेच्या होम क्वारंटाइनचे अपयश, बेड मिळत नसल्याच्या तक्रारी आणि बेडअभावी मृत्यूबाबत पालकमंत्री म्हणून माझ्याकडे तशाच तक्रारी आहेत. पत्रकारांप्रमाणेच माझेही मत आहे. काही अधिकारी काम करीत नाहीत, असे माझेही मत आहे पण तरीही तीन दिवस वाट पाहून मी निर्णय घेईन. अशी अगतिकता महापालिकेच्या कामकाजाविषयी पालकमंत्री भुजबळ यांची पत्रकार परिषदेत स्पष्ट दिसली. दोन वेळा पत्रकारांशी बोलताना त्यांनी हतबलता व्यक्त केली.  

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस आयुक्त दीपक पांडे, मुख्याधिकारी लीना बनसोड, ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न व औषध प्रशासनच्या सहाय्यक आयुक्त डॉ. माधुरी पवार आदी उपस्थित होते. 