नाशिक : संशयित दीपक डोके याने गेल्या बुधवारी (ता. ३१) सायंकाळी कोरोनाबाधित असलेल्या बाबासाहेब तात्याराव कोळे (रा. डीजीपीनगर) यांना खाटा मिळत नसल्याचा आरोप करत कोरोनाबाधित माहिती असूनही महापालिका मुख्यालयात आंदोलनासाठी आणले होते.
अखेर संशयित डोकेला अटक
रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णाला महापालिका मुख्यालयात आणत आंदोलन केल्याप्रकरणी दीपक डोके याच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संशयित डोकेला रविवारी (ता. ४) पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडूनदेखील चिमुरडी सुखरूप
घटनेची सखोल चौकशी पोलिस विभागाकडून सुरू
यासंदर्भात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संशयित दीपक डोके याने गेल्या बुधवारी (ता. ३१) सायंकाळी कोरोनाबाधित असलेल्या बाबासाहेब तात्याराव कोळे (रा. डीजीपीनगर) यांना खाटा मिळत नसल्याचा आरोप करत कोरोनाबाधित माहिती असूनही महापालिका मुख्यालयात आंदोलनासाठी आणले. ऑक्सिजन सिलिंडरसह महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात झालेले आंदोलन चर्चेचा विषय ठरला होता. कोळे यांच्या जिवाला धोका निर्माण होईल, अशी वर्तणूक केल्याचा ठपका महापालिका प्रशासनाने संशयित दीपक डोकेवर ठेवला होता.
हेही वाचा - महिलांनो सावधान! तुमच्या फेक अकाऊंटवरून पुरुषांना ब्लॅकमेलिंग; सायबर भामट्यांचा नवा प्रकार
या घटनेनंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात दीपक डोकेविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार, तसेच अन्य विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. या घटनेची सखोल चौकशी पोलिस विभागाकडून सध्या सुरू असून, काही पत्रकारांचेही जबाब घेतले आहेत. रुग्णालयांमध्येही यासंदर्भात चौकशी केली जात आहे. यानंतर रविवारी (ता. ४) सायंकाळी दीपक डोकेला पोलिसांनी अटक केली आहे.