आईच्या प्रियकराच्या कचाट्यातून बालिकेच्या सुटकेने साऱ्यांनाच अश्रू अनावर; पोलिसही भावनिक!

नाशिक : महिलेने प्रेमसंबंध तोडल्यानंतर प्रियकर तिच्या पाचवर्षीय बालिकेस जबरदस्ती घेऊन गेला. पोलीसांच्या कारवाईनंतर या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे.

आईच्या प्रियकराची पाचवर्षीय बालिकेस जबरदस्ती 

संबंधित महिलेचे संशयित गणेश केदारे (रा. म्हसरूळ) याच्याशी प्रेमसंबंध होते. तिला पाचवर्षीय मुलगी आहे. संशयित सराईत गुन्हेगार आहे. तो नेहमी तिला आणि मुलीस मारहाण करत. तिने प्रेमसंबंध तोडल्यानंतर तो तिच्या पाचवर्षीय बालिकेस जबरदस्ती घेऊन गेला. काही दिवसांपासून बालिका त्यांच्याबरोबरच होती. आई मुलीला घेण्यास गेली, की तो मारहाण करत. शेवटी तिने भद्रकाली पोलिस ठाण्याचे हवालदार शेरू पठाण आणि संतोष सानप यांच्याशी संपर्क करत त्यांना घडलेला प्रकार सांगितला. संशयितांविरुद्ध तक्रार अर्ज केला. त्यांनी महिलेसह महिला होमगार्ड संगीता जाधव यांना संशयिताच्या म्हसरूळ येथील घरी घेऊन गेले. घरात मुलगी मिळून आली. ती आईला बघताच आईकडे धाव घेत कुशीत गेली. पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत भद्रकाली पोलिस ठाणे गाठले.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

महिलेस अश्रू अनावरण

संशयित सराईत गुन्हेगार असून, पंचवटीसह विविध पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती या महिलेने पोलिसांना दिली. शिवाय त्यांच्यापासून धोका असल्याचेही सांगत त्यास समज देण्यास सांगितले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. आईच्या ताब्यात मुलीस दिल्यानंतर महिलेस अश्रू अनावरण झाले. हे पाहून उपस्थित पोलिस कर्मचारीही भावनिक झाले. महिला मुलीस घेऊन तिच्या गावी निघून गेली.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

पोलिसांनी बालिकेचा घेतला ताबा  

आईच्या प्रियकराच्या कचाट्यातून पाचवर्षीय बालिकेची भद्रकाली पोलिसांनी सुटका केली. प्रियकराच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात आईने तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार कारवाई करत प्रियकराच्या घरातून पोलिसांनी बालिकेचा ताबा घेतला.