आईविना ‘तो’ भिकारी! माऊलीच्या अंतिम इच्छेसाठी मुलाचा उन्हात पायी प्रवास; कापणार चक्क १२० किमी अंतर

नरकोळ (जि.नाशिक) : साता जन्माची धनदौलत साठवली तरी... मोठी तुझ्या प्रेमाची माधुकरी... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...या कवितेच्या पंक्तीतून आईचे महत्व आणि थोरवी कितीही गायली तरी कमीच आहे. असाच एक आईवेडा आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलगा चक्क १२० किमीलोमीटरचे अंतर भरउन्हात पायी कापून कर्तव्य निभावणार आहे. 

आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाचा चक्क १२० किमीृ पायी अंतर

बागलाण तालुक्यातील गोराणे येथील सोज्वळबाई नारायण देसले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थीचे विसर्जन नाशिक येथील रामकुंडात व्हावे, ही आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे प्राध्यापक पुत्र काकाजी देसले गोराणे ते नाशिक १२० किमीलोमीटरचे अंतर भरउन्हात पायी कापून कर्तव्य निभावणार आहे. शुक्रवारी (ता. १२) पहाटे नाशिक येथील रामकुंडात अस्थींचे विसर्जन होणार आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

गोराणे येथील देसले कुटुंबीयांनी पूर्ण केली इच्छा 
गोराणे येथील दौलत देसले दोन्ही बंधू ज्ञानदेव, प्रा. काकाजीसह राहतात. त्यांचे वडील नारायण देसले यांनी त्यांचे वडील (कै.) दावल देसले यांच्या अस्थीही नाशिक येथे पायी नेऊन विसर्जित केल्या होत्या. त्यानुसार ४० ते ४५ वर्षांपासूनची परंपरा खंडित न होऊ देता आई सोज्वळबाईंच्या अस्थींचे विसर्जन महाशिवरात्रीला होण्यासाठी काकाजी बुधवारी (ता. १०) पायी निघाले आहेत. प्रा. देसले शिक्षणमहर्षी भाऊसाहेब हिरे कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव येथे कार्यरत आहेत. कसमादेत हा चर्चेचा विषय बनला आहे. 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO

आमच्या देसले कुटुंबाने पायी जाऊन अस्थी विसर्जित करण्याची परंपरा पूर्ण केली. यासाठी दोन्ही बंधूंचे सहकार्य मिळत आहे. भरउन्हात त्रास होत असला तरी आईसाठी सर्व काही यानुसार पायी जात आहे. 
- प्रा. काकाजी देसले, गोराणे 
Associated Media Ids : NKL21B00436