आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी; अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

नाशिक : अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचा प्रकार द्वारका परिसरात घडला. गुरुवारी (ता.४) सकाळी प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. नेमका प्रकार काय?

दोघांचे सेल्फी आई-वडिलांना दाखविण्याची धमकी
संबंधित मुलीची मुलाशी गेल्या वर्षी ओळख झाली. त्यातून एकमेकांचे सेल्फी फोटो काढले होते. डिसेंबर २०२० मध्ये संधी साधत संशयित मुलाने घरी येतो, असे सांगितले. तिने नकार दिला. त्या वेळी दोघांचे सेल्फी आई-वडिलांना दाखविण्याची त्याने धमकी दिली. भीतीपोटी तिने त्यास घरात येऊ दिले. त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर वेळोवेळी घरात कुणी नसल्याची संधी साधत त्याने अतिप्रसंग केला. बुधवारी (ता.३) संशयित मुलगा घरात कुणी नसताना वारंवार घरी येत असल्याची माहिती मुलीच्या वडिलांना समजली. तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बाललैगिंक अत्याचार प्रतिबंध विरोधी कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला. संशयित अल्पवयीनास ताब्यात घेतले. त्यास बालन्यायालयात हजर केले असता, किशोर सुधारलयात रवानगी करण्यात आली.  

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा

भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल

सेल्फी फोटो आई-वडिलांना दाखविण्यासह त्यांना ठार करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचा प्रकार द्वारका परिसरात घडला. गुरुवारी (ता.४) सकाळी प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा -  'देवमाणूस' कडूनच कुकर्म; महिलेच्या आजारपणाचा घेतला गैरफायदा