आकाश रंजवे खून प्रकरण : फरारी संशयितास महिनाभरानंतर अटक

नाशिक : वडाळा नाका परिसरात गेल्या महिन्यात दोन गटांत वाद झाला होता. वादास दंगलीचे स्वरूप आले होते. त्यात आकाश रंजवे नामक तरुणाचा खून झाला होता, तर पवन टाक आणि करण लोट असे दोघे जखमी झाले होते. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान करण लोट (रा. महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) फरारी झाला होता. महिनाभरानंतर भद्रकाली पोलिसांनी त्यास तपोवन भागातून अटक केली. 

हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात घसरण सुरुच; गेल्या १० महिन्यांत निच्चांकी स्तर

फरारी संशयितास महिनाभरानंतर अटक 
रविवारी (ता. ७) पोलिस उपनिरीक्षक विजयसिंग जोनवाल यांना महिनाभरापासून फरारी संशयित करण लोट तपोवन भागात असल्याची गुप्त माहिती मिळाली. श्री. जोनवाल, हवालदार शेरू पठाण, आशिष गायकवाड तपोवन भागात दाखल झाले. संशयितास चाहूल लागताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने त्याला रात्री उशिरा अटक केली. महिनाभरापासून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळ काढत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.  

हेही वाचा - काळजावर ठेवला दगड आणि शेतकऱ्याने उभ्या पिकात सोडली मेंढरे! स्वप्न चक्काचूर