आक्षेपार्ह पत्रकाचे वाटप; दिंडोरी नाका परिसरात रास्ता रोको

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क –  पंचवटी परिसरात शनिवार (दि.२२) रेाजी पहाटेच्या सुमारास एका  समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह पत्रक वाटल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ज्या समाजाविरोधात आक्षेपार्ह पत्रक वाटण्यात आले आहेत. त्या संबंधित संपूर्ण समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे दिंडोरी नाका परिसरात रास्ता रोको सुरू असून अनेक ठिकाणी दुकाने बंद करण्यात आली आहे.

सदर पत्रकात असा मजकूर टाकलेला आहे…

जय श्री राम जय हिंदू राष्ट्र !!
इशारा !!!
काळाराम मंदिर आसपास असणाऱ्या सर्व अस्पृश्य शूद्रांना ताकीद देण्यात येते की …
मंदिरा जवळ कुठेही तुमचा निळा, पिवळा झेंडा लाऊ नये तसे केल्यास पाठीवर
पुन्हा झाडू आणि गळ्यात मडके देण्यात येईन…
हे हिंदू राष्ट्र आहे आणि काळाराम मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी महारा नी जे भीमटे स्तंभ उभारले आहे ते तत्काळ काढून टाकावे.
मंदिराच्या चारही दरवाजा वरुन ये जा बंद करणे
चप्पल घालून पंचवटी परिसरात फिरून प्रभू श्रीरामाच्या धरतीला मलिन करू
नये तसे दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहावे. जो कोणी परत निळा हातात घेऊन दिसला तरी त्याला वाळीत टाकण्यात येईल.
सर्व कट्टर हिंदूंनी शूद्र जाती सोबत मांग महार ढोर चांभार इत्यादी ना आपल्या घरी बोलवू नये त्यांच्या घरातील पाणी पिऊ नये. त्यांचा स्पर्श होऊ देऊ नये …
जय हिंदुराष्ट्र. जय श्रीराम.
श्री प्रथमेशदादा संदीप चव्हाण

रस्ता रोको मुळे ट्राफिक जाम झाली आहे. (सर्व छायाचित्रे – गणेश बोडके)

पुढील अपडेट साठी पाहत रहा  पुढारी न्यूज