आजपासून शहरात सिरो सर्वेक्षणाला होणार सुरवात; हर्डइम्युनिटी तपासणीसाठी मोहीम

नाशिक : शहरात किती लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली, हे तपासण्यासाठी शनिवार (ता. ९)पासून सिरो सर्वेक्षणाला सुरवात होणार आहे. सोमवार (ता. ११)पर्यंत हे सर्वेक्षण होणार असून, त्यात निश्चित केलेल्या अडीच हजार घरांमधील नागरिकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून अँटिबॉडीची टेस्ट होणार आहे. अहवाल परस्पर प्रयोगशाळा स्तरावरून संबधित लाभार्थ्यास दिला जाणार आहे. 

सॅम्पल महापालिकेचे आरोग्य कर्मचारी घेणा

महापालिका क्षेत्रात मे २०२० पासून कोरोनारुग्ण वाढण्यास सुरवात झाली. ऑक्टोबरपासून कमी प्रमाणात बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्या अनुषंगाने शासन स्तरावरून किती लोकांना कोरोनाची लागण झाली. अर्थात, हर्डइम्युनिटी तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने शनिवारपासून तपासणी होणार आहे. त्यासाठी सॅम्पल टेस्टिंग करून किती टक्के नागरिकांच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत, यावरून निश्चित केले जाते. नाशिक शहरातील १५ लाख लोकसंख्या लक्षात घेता, सॅम्पल टेस्टिंगसाठी सुमारे अडीच हजार रक्त नमुने संकलित करण्याचे निश्चित झाले असून, शहरातील विविध भागांतून १८ वर्षांवरील विविध वयोगटाचे स्त्री व पुरुष अशा दोन्ही प्रकारचे सॅम्पल महापालिकेचे आरोग्य कर्मचारी घेणार आहेत. 

हेही वाचा > रुग्णवाहिकाचालकाने अ‍ॅम्ब्युलन्समध्येच साधली संधी; अपघातग्रस्त रुग्णासोबतच धक्कादायक प्रकार

अँटिबॉडी टेस्टिंगसाठी सहकार्याचे आवाहन

प्रत्येक विभागातील लोकसंख्येनुसार व राहणीमानानुसार वर्गवारी करून अँटिबॉडी टेस्टिंग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रक्त नमुने घेण्यासाठी फक्त काही घरांचीच निवड केली आहे. घरामधील एकाच व्यक्तीचा रक्ताचे नमुने घेण्यात येणार आहेत. रक्त नमुना घेताना नागरिकाची संमतीपत्रावर स्वाक्षरी असणे बंधनकारक असेल. सिरो सर्व्हेमध्ये नागरिकांचे रक्त संकलित केले जाणार आहे. त्यासाठी ३० टीम कार्यरत राहतील. रक्त नमुने घेण्यासाठी घर व व्यक्तीची निवड तांत्रिक पद्धतीने केली जाणार आहे. अँटिबॉडी टेस्टिंगसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.  

हेही वाचा > चोरट्यासोबत जेव्हा 'ती' महिलाही चालत्या रेल्वेतून पडली खाली; घटनेने प्रवाशांचा थरकाप