आजाराचा तपशील बदलून देण्यास नकार; दांपत्याची महिला डॉक्टरांना मारहाण व शिवीगाळ

नाशिक : आजाराचा तपशील बदलून देण्याची मागणी दाम्पत्यांनी महिला डॉक्टर यांच्याकडे केली होती. मात्र डॉक्टरांनी त्यास नकार दिला. त्यानंतर दाम्पत्यांच्या कृत्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. वोक्हार्ट रुग्णालयात हा प्रकार घडला. काय घडले नेमके वाचा..

वोक्हार्ट रुग्णालयातील प्रकार

आजाराचे तपशील बदलून देण्यासाठी महिला डॉक्टरांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी दांपत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वोक्हार्ट रुग्णालयात हा प्रकार घडला. नीलेश राजू चव्हाण व लता राजू चव्हाण अशी संशयितांची नावे आहेत. डॉ. सुदर्शना गुणवंत पाटील (रा. तिडके कॉलनी) यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजाराचा तपशील बदलून देण्याची मागणी संशयितांनी डॉ. पाटील यांच्याकडे केली होती.

हेही वाचा>> पुन्हा पबजी गेमने घेतला जीव? घरात गळफास घेत १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

डॉक्टरांना मारहाण; दांपत्यावर गुन्हा 

मात्र डॉ. पाटील यांनी त्यास नकार दिल्याने संशयितांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. पी. गेंगजे तपास करत आहेत. 

हेही वाचा>> मुलीचा विवाह सुरू असतानाच वधूपित्याला लुटले! विवाहाच्या आनंदात विरजण